बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याची बहिण आणि अभिनेत्री सोहा अली खान ही सिनेसृष्टीपासून सध्या दूर आहे. सोहा अली खानने ‘दिल मांगे मोर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने इम्रान हाश्मीसोबत ‘तुम मिले’ या चित्रपटात काम केले होते. नुकतंच एका मुलाखतीत सोहाने इम्रान हाश्मीसोबत काम करण्याबाबतचा अनुभव शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच सोहा अली खानने ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली. यावेळी तिला विचारण्यात आले की जर तुला आर माधवन आणि इम्रान हाश्मी यांच्यापैकी एकाची निवड करायची असेल तर तू कोणाची निवड करशील? यावर सोहा म्हणाली की, “मी इम्रानसोबत जास्त काम केले आहे. कारण ‘तुम मिले’ या चित्रपटातील माझी भूमिका मोठी होती. मला दोन्ही अभिनेत्यांसोबत काम करण्याचा चांगला अनुभव आला आहे. पण मला इथे इम्रानचे नाव घ्यायला आवडेल. त्याच्या अभिनयाने माझ्यावर एक वेगळीच छाप पाडली आहे.”

“या आधी इम्रान मला फार वेगळा वाटायचा. पण तो खूप प्रोफेशनल आहे, हे मला चित्रपटादरम्यान कळलं. तो सेटवर नेहमी वेळेत येतो आणि तितक्यात उत्साहात काम करतो. मला आधी याबाबत कल्पना नव्हती. मला त्याच्यासोबत काम करण्यापूर्वी असे वाटायचे की तो चांगला अभिनेता नाही. पण इम्रानसोबत काम केल्यानंतर तो एक चांगला अभिनेता आहे हे मला कळले,” असेही तिने सांगितले.

“माझे बालपण मुंबईतील चाळीत गेले, पण सलमानमुळे…”, अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा

“मला इम्रान हाश्मीबद्दल फार नकारात्मक वाटायचे. तो उशिरा येत असावा, त्याला त्याच्या ओळी नीट आठवत नसाव्यात, अशा अनेक गोष्टी मला वाटायच्या. खरं तर, मी त्यापूर्वी कधीही त्याचे काम पाहिले नव्हते. पण जेव्हा मी त्याच्यासोबत काम केले तेव्हा मला समजले की मी त्याला कमी लेखले आहे, तो एक उत्तम अभिनेता आहे.” असेही ती म्हणाली.

“सलमान खान अजूनही मध्यरात्री…”, ‘पार्टनर’ चित्रपटातील अभिनेत्रीने केला गौप्यस्फोट

सोहा अली खान आणि इम्रान हाश्मी यांनी आतापर्यंत ‘तुम मिले’ या एकाच चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा चित्रपट कुणाल देशमुखने दिग्दर्शित केला होता. सोहाने ‘दिल मांगे मोर’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘मुंबई कटिंग’, ‘धुंदते रहे जाएंगे’, ‘दिल कबड्डी’, ‘प्यार में ट्विस्ट’ आणि ‘शादी नंबर १’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.