नृत्य दिग्दर्शिका म्हणून गाजलेली आणि आता दिग्दर्शन व अभिनयासाठी नावाजली जाणारी फराह खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खूप ताप आल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आपली प्रकृती आता बरी आहे, असे तिने ट्विट केले आहे.
सध्या गाजत असलेल्या ये जवानी है दिवानी चित्रपटातील गाण्यासाठी माधुरीला नृत्य दिग्दर्शन केल्यानंतर आता हपी न्यू इयर हा तिचा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे सध्या निर्मितीपूर्व काम सुरू आहे. बॉलीवूडबरोबरच टीव्हीच्या कोट्यवधी प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या रिअॅलिटी शोची परीक्षक म्हणून ती सर्वांच्या चांगल्या परिचयाची झाली. त्यामुळे फराहला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजताच बाॉलीवू़डचे कलावंत तसेच तिच्या चाहत्यांनीही ट्विट केले. या ट्विटला उत्तर देताना फराह खान म्हणाली की, आता प्रकृती ठीक असून दोन दिवसांत घरी जाणार आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बाहेर पडणारा पाऊस पाहत चहा-ब्रेड खात बसली आहे. आपले चाहते आणि बाॉलीवूडमधील सहकारी सगळ्यांनीच चिंता व्यक्त केली. परंतु, आपली प्रकृती ठीक असून लवकरच घरी परतणार आहे, असे तिने ट्विट केले आहे.

Story img Loader