हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथ अलिकडेच प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने ऑस्कर पुरस्कार २०२२ दरम्यान कॉमेडियन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. त्यांच्यातील हा वाद प्रचंड गाजला होता. सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता या प्रकरणावर क्रिसने अलिकडेच प्रतिक्रिया दिली. विलने माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम विनोदासाठी कानशिलात मारली असं क्रिस म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑस्कर अवॉर्ड फंक्शनदरम्यान क्रिसने विल स्मिथच्या वाय जाडा पिंकेटची खिल्ली उडवल्याने विलने त्याच्या कानशिलात लगावली होती. क्रिस रॉकने इंग्लंडमध्ये डेव्ह चॅपेल यांच्या कॉमेडी शोदरम्यान याबाबत भाष्य केलं. त्यांनी क्रिस रॉकला विचारलं, “हा फटका खूप जोरदार होता का?” त्यावर क्रिस रॉक म्हणाला, “हो हे अगदी खरे आहे आणि त्याने छोट्या विनोदावर जोरदार फटका मारला होता. तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम विनोद होता.”
आणखी वाचा-‘लायगर’च्या अपयशानंतर सहनिर्मातीचा सोशल मीडियाला रामराम, म्हणाली “जगा आणि…”

क्रिस रॉकने ऑस्कर २०२२ च्या सोहळ्यात विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेटच्या टक्कलची खिल्ली उडवली होती. प्रत्युत्तरादखल विल स्मिथने स्टेजवर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर, विल स्मिथला पुढील १० वर्षे अकादमी पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा- विल स्मिथने कानशिलात लगावल्यानंतर क्रिस रॉकने नाकारली ऑस्करची ‘ही’ ऑफर? यामागचं नेमकं कारण काय?

दरम्यान, नंतर विल स्मिथने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला होता. याबाबत विलने क्रिस रॉकशी बोलण्याचाही प्रयत्न केला, पण क्रिसने त्याच्याशी बोलण्यास किंवा भेटण्यास नकार दिला. यानंतर, एका व्हिडीओच्या माध्यमातून विलने या घटनेबद्दल क्रिस रॉक आणि त्याची आई रोझ रॉकची माफीही मागितली होती.