जगभरातील प्रेक्षक दरवर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची वाट पाहत असतात. २०२२मधील ९४वा ऑस्कर पुरस्कार सोहळा देखील दिमाखात पार पडला. पण या सोहळ्यादरम्यान एक घटना घडली. त्या घटनेची आजही चर्चा होताना दिसते. ९४व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर हात उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली. भर पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या कानशिलात लगावली असल्याचं क्रिस रॉक अजूनही विसरला नाही. आता त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानला बॉयकॉट ट्रेंडची भीती, हिंदी चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर घेतला मोठा निर्णय

पुढील वर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सध्या चर्चा सुरु झाली आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या सुत्रसंचालनासाठी क्रिस रॉकला विचारण्यात आलं होतं. पण ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सुत्रसंचालन करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला असल्याची चर्चा आहे. क्रिसने यासाठी नकार का दिला? यामागचं कारण नेमकं काय? याबाबतही आता चर्चा सुरु झाली आहे.

विल स्मिथने क्रिसला कानशिलात लगावली असल्याचं प्रकरण लक्षात ठेवून त्याने ऑस्करचं सुत्रसंचालन करण्यास नकार दिला असल्याचं बोललं जात आहे. पण खरंच क्रिस रॉकने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सुत्रसंचालन करण्यास नकार दिला आहे का? याबाबत त्याने स्वतः अजूनही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

आणखी वाचा – “ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेले अन्…” एका चहाची किंमत पाहून हेमांगी कवीच्या भुवया उंचावल्या

२०२२च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात असे काही घडले जे या पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासात आजपर्यंत कधीही घडले नाही. विल स्मिथच्या पत्नीचे नाव जेडा पिंकेट स्मिथ आहे. ऑस्कर सोहळ्यादरम्यान ती विलसोबत प्रेक्षकांमध्ये बसली होती. यामध्ये अभिनेता-कॉमेडियन क्रिस रॉक स्टेजवर आला. त्याने जेडाची खिल्ली उडवली. क्रिसने जेडाला G.I. Jane २ मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे असे यावेळी म्हटले. यावेळी, विल स्मिथ स्टेजवर पोहोचला आणि त्याने क्रिस रॉकला कानाखाली मारली. विल स्मिथने ख्रिसला मारले कारण तो त्याची पत्नी जेडाची चेष्टा करत होता. स्टेजवरून खाली आल्यानंतर विल स्मिथने ख्रिसला ओरडून सांगितले की, त्याच्या तोंडून त्याच्या पत्नीचे नाव घेऊ नको. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ जगभरात व्हायरल देखील झाला.

Story img Loader