कपूर कुटुंब बॉलिवूडमधलं असं कुटुंब आहे, जे नेहमीच प्रत्येक सण एकत्र साजरा करतात. यावेळी त्यांनी एकत्र ख्रिसमस हा सण देखील साजरा केला. त्यांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यात संपूर्ण कपूर कुटुंब दिसत आहे, पण या फोटोत आलिया आणि रणबीर दिसत नाही आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कपूर कुटुंबाचे २०२१चे ख्रिसमसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये संपूर्ण कुटुंब हे ख्रिसमसच्या रंगात रंगलं आहे. सगळे आनंदात दिसणार आहे. हे फोटो अरमान जैनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करत मेरी ख्रिसमस हे कॅप्शन त्याने दिले आहे. या फोटोमध्ये शम्मी कपूर, नीला देवी आणि रिमा जैन डायनिंग टेबलवर दिसत आहेत. तर सगळे छोटे मागे उभे आहेत. शशि कपूर यांचा मुलगा कुणाल कपूरच्या जुहूमध्ये स्थित असलेल्या घरात ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा : बिग बींचा दाऊद इब्राहिमसोबतचा फोटो व्हायरल? अभिषेकने दिले होते स्पष्टीकरण

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

दरम्यान, या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये करीना कपूर, सैफ अली खान, तैमूर अली खान, जेह अली खान, करिश्मा कपूर, बबिता, तारा सुतारिया, आदर जैन, जनिफर केंडल, जहान कपूर दिसत आहेत. पण त्यांच्यासोबत रणबीर आणि आलिया दिसले नाही. तर असे म्हटले जाते की महेश भट्ट आणि आई सोनी राजदानसोबत ख्रिसमस डिनर पार्टीसाठी आलिया आणि रणबीर थांबले होते. त्यामुळेच ते दोघे कपूर कुटुंबातील ख्रिसमस पार्टीत दिसले नाही.