Oppenheimer Box office collection : सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची फारच आतुरतेने वाट पहात असतात. त्याच्या चित्रपटाची क्रेझ आपल्या भारतातही प्रचंड बघायला मिळते. नुकताचा त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात गेले काही दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रीपोर्टनुसार ‘ओपनहायमर’ने पहिल्याच दिवशी १३ ते १४ कोटींचा व्यवसाय केला असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘ओपनहायमर’बरोबरच हॉलिवूडचा ‘बार्बी’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता, पण त्यापेक्षा सर्वात जास्त उत्सुकता ही ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटासाठी बघायला मिळाली.

आणखी वाचा : सेक्स करताना भगवद्गीतेचं वाचन; ‘ओपनहायमर’मधील त्या सीनवर भडकले नेटकरी; म्हणाले “लाज वाटली…”

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिशन इम्पोसीबल ७’ आणि ‘फास्ट एक्स’ या दोन्ही चित्रपटांना मागे टाकत ‘ओपनहायमर’ भारतात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘मिशन इम्पोसीबल ७’ने पहिल्याच दिवशी १२.५० कोटी कमावले होते. त्यामुळे नोलनच्या या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

‘ओपनहायमर’ या चित्रपटाला काश्मीरमध्ये सुरू झालेल्या एकमेव चित्रपटगृहातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांनीही चित्रपटाचं प्रचंड कौतुक केलं आहे. ओपनहायमर यांनी हिंदू धर्मातील वेद आणि भगवद्गीतेचा प्रचंड अभ्यास केला होता, त्यासाठी ओपनहायमर संस्कृत शिकले होते. चित्रपटातही या गोष्टीचा उल्लेख दोन ठिकाणी आला आहे. नोलनच्या या बहुचर्चित चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केली आहे. त्याच्याबरोबरच रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Christopher nolan directed oppenheimer film box office collection day one avn
Show comments