पी. वाय. फिल्म्सची निर्मिती असलेला अक्षादित्य लामा दिग्दर्शित ‘सिगरेट की तरह’ हा नवा रोमँटिक थ्रिलर चित्रपट येत्या १४ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात भूप परदेशी व मधुरीमा तूली या दोन नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे.
चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सुदीप बॅनर्जी, अंकुर-विराज आणि कविता सेठ यांनी तर अजय झिंग्रान, कौशल किशोर यांची गीते तर संकलन तिरूपती रेड्डी यांचे आहे. या चित्रपटात एकूण ५ गाणी असून तोची रैना, निखिल डीसूजा, कविता सेठ, श्वेता पंडित, सुझान डिमेलो, सुदीप बॅनर्जी यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण गोवा व मुंबई या ठिकाणी झाले. १५ कोटींचे बजेट असलेल्या हा चित्रपट एकाचवेळी ८०० सिनेमागृहांत प्रदर्शित होणार असल्याची माहिती भूप परदेशी व मधुरीमा तूली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cigarette ki tarah releasing soon