मनोरंजन विश्वात ‘संस्कारी बाबुजी’ अशी ओळख असलेल्या अभिनेता अालोक नाथ यांच्यावर निर्मात्या, लेखिका विनता नंदा यांनी बलात्कारचा आरोप केल्यानं मनोरंजन विश्वच हादरून गेलं आहे. या प्रकरणात अालोक नाथ यांच्याविरोधात आता ‘सिंटा’ म्हणजेच ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे.
१९९० मधील गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्मात्या विनता नंदा यांनी अालोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला . या प्रकरणानंतर ‘सिंटा’चे सरचिटणीस सुशांत सिंग यांनी ट्विट करत अालोक नाथ यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचं म्हटलं आहे. अालोक नाथ यांच्याविरोधात तक्रार दाखल करा. त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सुशांत सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Cine and TV Artists Association (CINTAA) to issue a notice to actor Alok Nath seeking his stand on sexual harassment allegations made against him by a show writer. pic.twitter.com/E4Mvuoqb48
— ANI (@ANI) October 9, 2018
Dear @vintananda I am so so sorry. As @CintaaOfficial a show-cause Notice will be sent to @aloknath first thing in the mrng, why he shudnt b expld. Unfortunately we’ve to follow the due process. I urge u to file a complaint against this vile creature, we extend u full support.
— सुशांत सिंह sushant singh سشانت سنگھ (@sushant_says) October 8, 2018
तनुश्री दत्ता नाना पाटेकर प्रकरणात ‘सिंटा’ नं हात वर केले होते. नंतर या प्रकरणात ‘सिंटा’ नं तिची माफी देखील मागितली होती. या प्रकरणात तनुश्रीला मदत करण्यास आम्ही असमर्थ आहोत मात्र अन्य कोणत्याही कलाकारासोबत यापुढे अन्याय घडू देणार नाही असं ‘सिंटा’नं म्हटलं होतं. त्यामुळे आता तत्परतेनं ‘सिंटा’नं विनता नंदा – अालोक नाथ प्रकरणात लक्ष घातलं आहे.
२० वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील ‘सर्वात संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केला. ते माझ्या मैत्रीणीचे पती होते. या धक्क्यातून सावरायला मला खूपच वेळ लागला पण अखेर माझ्यासोबत झालेल्या अन्यायाविरोधात वाचा फोडण्याचं बळ मला मिळालं आहे असं म्हणतं विनता यांनी सोशल मीडियावर भावनांना वाट मोकळी करून दिली.