सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल त्यांच्या सहकलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी काम केलं होतं. अभिनेता आर. माधवनने याबद्दल ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जॉनी यांनी ‘रहना है तेरे दिल में’, ‘पार्टनर’, ‘ओम जय जगदीश’, ‘मुझे कुछ कहना है’ अशा अनेक चित्रपटांसाठी काम केलं होतं. या चित्रपटांमधले त्यांचे सहकलाकार, तुषार कपूर, आर.माधवन, सतिश कौशिक यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

याबद्दल दुःख व्यक्त करताना माधवन म्हणतो, “काही ना काही वाईट घडतच आहे आणि आम्ही एक खूप चांगला माणूस आज गमावला. तुमच्यातल्या गुणांमुळे तुम्ही कायम लक्षात राहाल. तुम्ही ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून आमच्यातलं सर्वोत्तम बाहेर काढलंत…..आता स्वतः स्वर्गाकडे मार्गस्थ झाला आहात”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

तर अभिनेता तुषार कपूरनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सतिश कौशिक यांनी केलं होतं आणि याची सिनेमॅटोग्राफी जॉनी यांनी केली होती. या चित्रपटातून तुषारने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करताना तुषार म्हणतो, “भावपूर्ण श्रद्धांजली जॉनी सर! आजही जो तरुण वाटतो असा ‘मुझे कुछ कहना है’ चित्रपट बनवल्याबद्दल तुमचे आभार.माझ्या चित्रपटातल्या माझ्या चुकांना सांभाळून घेतल्याबद्दल तुमचे आभार”.

सतिश कौशिक यांनीही जॉनी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून धक्का बसल्याचं सांगितलं आहे. त्यांनी आपलं दुःख सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.
‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘फूल एन फायनल’, ‘शादी नं. १’ अशा चित्रपटांसाठीही त्यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं आहे.

Story img Loader