भूषण कडू आणि संजय नार्वेकर हे दोघे अभिनेते ‘सर्किट हाऊस’ या आगामी विनोदी नाटकाच्या माध्यमातून पहिल्यांदा रंगभूमीवर एकत्र येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रंगभूमीवर सादर होणाऱ्या पुनरुज्जीवित विनोदी मराठी नाटकांच्या पाश्र्वभूमीवर या नाटकाचे वेगळेपण असे की ते पुनरुज्जीवित नाही. प्रवेश आणि रसिकरंजन निर्मित या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. गौतम जोगळेकर लिखित या नाटकात सत्ताधारी पक्षाचा एक नेता विरोधी पक्षातील एका नेत्याच्या सचिवाला घेऊन ‘सर्किट हाऊस’ मध्ये येतो. हे दोघेही येथे पोहोचतात, तेव्हा तिथे वेगळेच नाटय़ घडलेले असते. यातून सुटका करून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा नेता आपल्या स्वीय सचिवाला तेथे बोलावून घेतो. पण सुटका होण्याऐवजी गुंता वाढतो आणि यातून धमाल घडते ती यात पाहायला मिळणार आहे. नाटकाचा पहिला प्रयोग २ नोव्हेंबर रोजी सादर होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2014 रोजी प्रकाशित
भूषण कडू आणि संजय नार्वेकर यांचे सर्किट हाऊस
भूषण कडू आणि संजय नार्वेकर हे दोघे अभिनेते ‘सर्किट हाऊस’ या आगामी विनोदी नाटकाच्या माध्यमातून पहिल्यांदा रंगभूमीवर एकत्र येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रंगभूमीवर सादर होणाऱ्या पुनरुज्जीवित विनोदी मराठी नाटकांच्या पाश्र्वभूमीवर या नाटकाचे वेगळेपण असे की ते पुनरुज्जीवित नाही.
First published on: 29-10-2014 at 06:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Circuit house by bhushan kadu sanjay narvekar