बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर’ आणि ‘टायगर २’ या दोन चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता प्रेक्षक ‘टायगर ३’ ची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि कतरिना दोघे ही रशियाला रवाना झाले आहेत. त्यांचा मुंबई विमानतळावरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विमानतळावरील केंद्रीय सुरक्षा दलाच्या (CISF) जवानाची चर्चा सुरु होती. या जवानाने सलमानला ओळख निश्चिती करण्यासाठी थांबवले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी केंद्रीय सुरक्षा दलाच्या त्या जवानाची स्तुती करत होते. मात्र, या सगळ्यात आता सीआईएसएफ जवान सोमनाथ मोहंती यांचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा : टायगर श्रॉफने मुंबईतील सगळ्यात महागड्या ठिकाणी घेतले घर!

सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की सलमानला विमानतळावर थांबवल्यानंतर सोमनाथ मीडियाशी बोलले होते. हे प्रोटोकॉलचे उल्लंघन असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. सोमनाथ यांनी या पुढे कोणत्याही मीडिया हाऊसशी बोलू नये, म्हणूनच त्यांचा फोन जप्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले होते ‘असे’ उत्तर

जेव्हा कोणते ही सेलिब्रिटी चित्रीकरणासाठी बाहेर जातात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची टीम देखील जाते. त्यांची टीम विमानतळावर किंवा आणखी कुठे ही व्हेरिफिकेशनचं काम करते कारण या सगळ्यात त्या सेलिब्रिटींना थांबायची गरज नाही. मात्र, सोमनाथ यांनी सलमानला व्हेरिफिकशेन न करत आत जाऊ दिले नाही आणि त्यांनी सलमानला व्हेरिफिकेशन होई पर्यंत थांबायला सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cisf seized mobile phone of cisf officer who stappoed salman khan for verification at the airport dcp