बॉलिवूड जोडी प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर यांच्या प्रेमाचे किस्से बॉलिवूडमध्ये खूप चवीने चघळले गेले. नंतर काही करणाने यांच्यात बिनसल्याचे वृत्त माध्यमातून प्रसिद्ध झाले. आता शाहिद कपूरचा ‘हैदर’ आणि प्रियांका चोप्राचा ‘मेरी कोम’ हे चित्रपट या वर्षी २ ऑक्टोबरला एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श आपल्या टि्वटरवरील संदेशात म्हणतात,
“‘हैदर’ चित्रपट २ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा युटीव्हीने केली. शाहिद कपूर, तब्बू, श्रद्धा कपूर आणि के.के.ची भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांचे आहे.” विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शन आणि शाहिदचा अभिनय असलेला ‘हैदर’ शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’वर आधारित आहे, तर प्रियांका चोप्राचा अभिनय असलेला ‘मेरी कोम’ भारताला मुष्ठियुद्ध प्रकारात ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक मिळवून देणाऱ्या मेरी कोमच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन उमंग कुमार यांचे असून, संजय लिला भन्साळी हे चित्रपटाचे निर्माता आहेत. शाहिद आणि प्रियांका दोघांनी आपल्या चित्रपटाचा ‘आत्तापर्यंतचा सर्वात कठीण चित्रपट’ असा उल्लेख केला आहे. २००९ साली विशाल भारद्वाज यांच्या ‘कमिने’ चित्रपटाच्या सेटवर भेटलेल्या शाहिद आणि प्रियांकामध्ये भेटता क्षणी हृदयात ‘प्रेमाची घंटी’ वाजली. परंतु, २०११ साली त्यांनी आपल्या रिलेशनशिपला पूर्णविराम दिला. त्यानंतर २०१२ सालच्या ‘तेरी मेरी कहानी’ चित्रपटात ते दोघे एकत्र दिसले होते.

Story img Loader