सध्या फक्त चित्रपट, मालिका किंवा सिनेमातील गाणी इतके मर्यादित मनोरंजन राहिलेले नाही. मनोरंजनाच्या कक्षा रुंदावल्या असून, त्या बाबी प्रेक्षकांसाठी सहज उपलब्धदेखील होताना दिसतात. आता यूट्यूबवर एक मराठी गाणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यूट्यूबवर कोक स्टुडिओने ‘बायो’ नावाचे एक गाणे प्रदर्शित केले आहे. सृष्टी तावडे आणि सायली खरे यांच्या आवाजातील या गाण्याने धुमाकूळ घातला आहे.

बायो या गाण्याबद्दल बोलायचे, तर हे गाणे महिलांविषयी आहे. त्यांना समर्पित आहे. गाण्याचे बोल, महाराष्ट्राची संस्कृती, ढोल-ताशा, डोक्याला फेटा, पाठीमागे दिसणारी वारली चित्रकला यांमुळे या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Maharashtrachi Hasya Jatra inside rehearsal video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘अशी’ होते रिहर्सल! शिवालीने केलं भन्नाट ‘टंग ट्विस्टर’, मालवणी भाषा अन्…; पाहा व्हिडीओ

‘बायो’ हे गाणे प्रदर्शित करताना डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे, “महाराष्ट्रातील स्त्रियांमार्फत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सौंदर्य आणि सामर्थ्य साजरे करीत आहोत. महाराष्ट्राची संस्कृती आपल्या सुंदर आणि सक्षम महिलांच्या खांद्यावर अभिमानाने विसावली आहे. ती निसर्गाची शक्ती आहे, मातीचा कण आहे व मायावी स्वप्न आहे. ‘बायो’ अशा सर्व स्त्रियांसाठी ज्या स्वत:साठी एकत्र येतात, त्यांच्या आत्मविश्वासासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी आणि तुमच्या आवाजासाठी आहे. सर्व महिलांची शक्ती तुमच्या पाठीशी आहे. बायो तुमच्यामधील शक्तीची आठवण करून देण्यासाठी आहे”, असे म्हटले आहे. त्याबरोबरच आजच्या स्त्रियांना समर्पित बायो हे गाणे कोक स्टुडिओ भारत अभिमानाने सादर करीत आहे, असेही म्हटले आहे. या गाण्याचे नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत. महिलांचे सशक्तीकरण, एकजूट दाखवणारे हे गाणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

कोक स्टुडिओ भारत

काय म्हणाले नेटकरी?

बायो हे गाणे यूट्यूबवर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या गाण्याचे कौतुक केले आहे. ज्या प्रकारे या गाण्याची रचना केली आहे, गाणे सादर करताना कल्पकता दाखवली आहे. तसेच महिलांचा महाराष्ट्रीयन लूक यांमुळे नेटकऱ्यांनी बायोचे कौतुक केले आहे. एक नेटकरी म्हणतो, “या महिलांनी कमाल केली आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे, पार्श्वभूमीमध्ये दिसणाऱ्य़ा वारली चित्रकलेने लक्ष वेधून घेतले.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “अशी गाणी प्रदर्शित व्हायला हवीत.” तर एका नेटकऱ्याने, “महाराष्ट्रीयन असल्याबद्दल अभिमान आहे”, असे म्हटले आहे. आणखी एक नेटकरी, “ढोल-ताशाच्या आवाजाने अंगावर काटा आला.”असे म्हणतो.

हेही वाचा: Stree 2 Movie Collection : ‘स्त्री-२’ ठरला बॉक्स ऑफिस रेकॉर्डब्रेक सिनेमा, अवघ्या चार दिवसांत केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

दरम्यान, बायो या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून, याला एक दशलक्षा(मिलियन)पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. आता हे गाणे आणखी किती व्हुज मिळवणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader