Coldplay In Mumbai : बहुप्रतीक्षित अशा कोल्डप्ले बँडचा कॉन्सर्ट भारतात होणार आहे. पहिला कॉन्सर्ट नवी मुंबई येथे होणार असून त्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यातच कोल्डप्ले बँडचे मुंबईत आगमन झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेक नेटिझन्स हे व्हिडीओ आनंदाने शेअर करत त्यावर कमेंट करत आहेत. काल मुंबई विमानतळावर जगप्रसिद्ध युके बँड कोल्डप्लेचा मुख्य गायक ख्रिस मार्टिनचे आगमन झाले आहे. याबरोबरच त्याच्याबरोबर आलेल्या एका व्यक्तीने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

कोल्डप्ले बँडचा मुख्य गायक ख्रिस मार्टिन हा हॉलीवूड अभिनेत्री डेकोटा जॉन्सनला डेट करत आहेत. तिने आपल्या प्रियकराच्या भारतातील शोला हजेरी लावल्यामुळे चाहते प्रचंड उत्साही आहेत. डेकोटा जॉन्सनने ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ आणि ‘मॅडम वेब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.

Intruder entered in Jeh bedroom Saif Ali Khan's staff narrates attack sequence
जेहच्या खोलीतील बाथरूममध्ये…; सैफ अली खानच्या घरात काय घडलं? करीना कपूर कुठे होती? मदतनीसने सगळंच सांगितलं
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maharashtra Live News Updates in Marathi
Saif Ali Khan Health Updates : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणीही ताब्यात नाही; मुंबई पोलिसांची माहिती
Saif Ali Khan's attacker detained by Mumbai Police
Saif Ali Khan Stabbed Case: सैफ अली खानवर चाकूहल्ला करणारा सापडला? मुंबई पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात, चौकशी सुरू!
Saif Ali Khan Attack Suspect CCTV footage
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी कोण? CCTV फूटेज व्हायरल; ‘त्या’ व्हिडीओत पोलिसांना काय सापडलं?
allahabad high court justice shekhar kumar yadav
Justice Shekhar Yadav: वाद होऊनही अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ‘त्या’ विधानावर ठाम; म्हणाले, “मी नियम मोडलेला नाही”!
Narayangaon Pune Accident 9 people died
Narayangaon Pune Accident : पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर
Harbhajan Singh react on dressing room conversation leak
Harbhajan Singh : ‘सर्फराझने ड्रेसिंग रूमच्या गोष्टी लीक केल्या असतील तर कोचने…’, हरभजन सिंगची संतप्त प्रतिक्रिया

हेही वाचा…स्मिता पाटील यांची सावत्र मुलगी आहे ‘या’ अभिनेत्याची दुसरी बायको; राज बब्बर यांची लेक पतीबद्दल म्हणाली…

मुंबईत उतरल्यावर ख्रिसने पापाराझींसाना केले ‘नमस्कार’

व्हायरल व्हिडीओमध्ये ख्रिस मार्टिनने मुंबई विमानतळावरून बाहेर आल्यावर तो पापाराझींना हात दाखवून नंतर नमस्कार केला. आणखी एका व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर त्याची प्रेयसी डेकोटा जॉन्सन त्याच्याबरोबर मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसली.

असा असेल कोल्डप्लेचा भारत दौरा

कोल्डप्लेच्या भारतातील बहुप्रतिक्षित कॉन्सर्ट्सना २०२५ मधील सर्वात मोठ्या आकर्षणांपैकी एक मानले जात आहे. ब्रिटिश बँड त्यांच्या ‘म्युझिक ऑफ द स्फीयर्स वर्ल्ड टूर’ अंतर्गत नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये १८, १९ आणि २१ जानेवारी २०२५ रोजी तीन शो करणार आहे. या व्यतिरिक्त, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २५ जानेवारी २०२५ रोजी चौथा शो होईल. कोल्डप्लेने यापूर्वी २०१६ मध्ये मुंबईतील ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये भारतात परफॉर्म केले होते.

हेही वाचा…घुसखोर जेहच्या पलंगाकडे गेला अन्…; सैफ अली खानच्या मदतनीसने सांगितला घटनाक्रम

ख्रिस मार्टिन पोहोचला मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर

ख्रिस मार्टिनचे मुंबईत आगमन झाल्यावर त्याने सर्वात आधी मुंबईच्या मरीन ड्राइव्हला भेट दिली आहे. कोल्डप्लेच्या इन्स्टाग्राम पेजवर त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने, “आम्ही भारतात येऊन खूप आनंदी आहोत” असे कॅप्शन दिले आहे.

स्टेजवर लहान मुलांना बंदीचे निर्देश

अहमदाबादच्या जिल्हा बाल संरक्षण युनिटने ख्रिस मार्टिन आणि कोल्डप्ले कॉन्सर्ट आयोजकांना २५ आणि २६ जानेवारी २०२५ रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर मुलांना आणू नये अशी सूचना केली आहे.

हेही वाचा…“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?

तसेच, आयोजकांना हे देखील सांगितले आहे की, मुलांना इअरप्लग किंवा इअर प्रोटेक्शनशिवाय कॉन्सर्टमध्ये प्रवेश देऊ नये. युनिटने असेही सांगितले आहे की, कॉन्सर्टमधील १२० डेसिबलपेक्षा जास्त आवाज मुलांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतो. या निर्देशांचे पालन न केल्यास अहमदाबाद जिल्हा बाल संरक्षण युनिट कडून कठोर कारवाई केली जाईल. असे सांगण्यात आले आहे.

Story img Loader