Coldplay Chris Martin Dakota Johnson Temple Visit: कोल्डप्ले बँडचा आज नवी मुंबईत कॉन्सर्ट होणार आहे. कोल्डप्लेने मुंबईत कॉन्सर्ट करण्याची घोषणा केली, तेव्हापासून चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अखेर कॉन्सर्टचा दिवस उजाडला आहे. कॉन्सर्टसाठी कोल्डप्ले बँडचे सदस्य मुंबईत पोहोचले आहेत. या बँडचा मुख्य गायक ख्रिस मार्टिनबरोबर त्याची गर्लफ्रेंडही भारतात आली आहे.
ख्रिस मार्टिन हॉलीवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सनला डेट करत आहे. कोल्डप्लेच्या या कॉन्सर्टसाठी डकोटा ख्रिसबरोबर आली आहे. दोघांचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्यांचा मंदिरातील व्हिडीओ चर्चेत आहे. ख्रिस व डकोटा दोघेही श्री बाबुलनाथ मंदिरात दर्शनाला गेले, त्यांचे मंदिरातील व्हिडीओ समोर आले आहेत.
४७ वर्षांचा ख्रिस पारंपरिक निळा कुर्ता घालून मंदिरात गेला होता, तर डकोटाने देखील पारंपरिक प्रिंटेड कुर्ता घातला होता. दोघांच्या पोशाखात भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. यावेळी ख्रिसने गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती, तर ३५ वर्षीय डकोटाने तिच्या डोक्यावर ओढणी घेतली होती.
पाहा व्हिडीओ –
एका व्हिडीओमध्ये, डकोटा तिची इच्छा नंदीच्या कानात तिची इच्छा व्यक्त करताना दिसतेय. नंदीच्या कानात मनातील इच्छा सांगणं ही महादेवाच्या मंदिरात प्रार्थना करण्याची पारंपरिक पद्धत आहे.
ख्रिसबरोबर डकोटा भारतात आल्याने या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दोघेही २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहेत, पण २०२४ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालंय, अशा बातम्या येत होत्या. पण कोल्डप्लेच्या कॉन्सर्टसाठी ख्रिसबरोबर डकोटा भारतात आली, त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल होणाऱ्या चर्चा या फक्त अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा – “किती वेळ लागेल”, जखमी सैफ अली खानने रिक्षा चालकाला विचारलेला प्रश्न; म्हणाला, “खूप रक्तस्त्राव…”
कोल्डप्ले हा ब्रिटिश बँड आहे. ते त्यांच्या ‘म्युझिक ऑफ द स्फीयर्स वर्ल्ड टूर’ अंतर्गत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये १८, १९ आणि २१ जानेवारी २०२५ रोजी तीन शो करणार आहे. त्यांचा चौथा शो गुजरातमधील अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर २५ जानेवारी २०२५ रोजी होईल.