“कुटुंब” म्हटलं की सुख दुःखात साथ ही आलीच. कुटुंबामध्ये जिव्हाळा, प्रेम, माया, रूसवे – फुगवे हे पण आलेच. प्रेक्षकांवर अनेक वर्षांपासून विविध रंगाची उधळण करत असलेले मनोरंजन विश्वातील एक कुटुंब ज्याने रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये बहुरंगी मनोरंजक कार्यक्रमामधून अल्पावधीतच आपली विशेष ओळख निर्माण केली आणि प्रेक्षकांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले, ते कुटुंब म्हणजे “कलर्स मराठी”. मालिकांतील व्यक्तिरेखांशी रसिकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. किंबहुना या व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या घराघरातील अत्यंत महत्त्वाच्या भाग बनल्या आहेत. नुकताच कलर्स मराठी अवॉर्ड सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेने सहा पुरस्कार पटकावत बाजी मारली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्यावहिल्या कलर्स मराठी अवॉर्डमध्ये लोकप्रिय मालिका या विभागाच्या स्पर्धेत चांगलीच चुरस रंगली पण बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेने लोकप्रिय मालिकेचा मान पटकावला आणि लोकप्रिय नायक आणि नायिकेचा मान मिळाला सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेतील सिद्धार्थ आणि अनुश्रीला… तर जीव झाला येडापिसा मालिकेमधील लष्करे कुटुंब ठरलं लोकप्रिय कुटुंब…लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा (विभागून) देण्यात आले घाडगे & सून मधील वसुधा आणि जीव झाला येडापिसा मालिकेतील मंगल. तर लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील पंच यांना मिळाला.

लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम ठरला सूर नवा ध्यास नवा. लोकप्रिय सूत्रसंचालक महेश मांजरेकर आणि लोकप्रिय व्यक्तिरेखा (विभागून ) बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील बाळूमाम आणि स्वामिनी मालिकेतील गोपिकाबाई यांना मिळाला.

कलर्स मराठी अवॉर्ड मध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. आजवर मालिकांमध्ये प्रेक्षक ज्या कलाकारांना बघत आले आहेत त्याहून वेगळ्या अंदाजात ते या अवॉर्डमध्ये दिसणार आहेत. दीपावलीच्या शुभमुहूर्तावर भव्यदिव्य नृत्यासह भंडारा उधळून सोहळ्यामध्ये बाळूमामाच्या नावाचा जागर होणार आहे. ज्यांना आपण नकारात्मक भूमिकेमध्ये बघत आलो त्यांचादेखील एक वेगळा अंदाज डान्सच्या माध्यमातून दिसणार आहे. हा पुरस्कार सोहळा २७ ऑक्टोबर रोजी दु. १२ वाजता प्रसारित होणार आहे. 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi awards 2019 balu mamachya navan changbhal serial got six awards ssv