आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नंदकिशोर हुकुमशाह होणार असून, घरातील इतर सदस्य प्रजा असणार आहेत. आता नंदकिशोर हुकुमशहा झाल्यावर ‘द ग्रेट डिक्टेटर’ या कार्यामध्ये काय घडणार… कोणाचा संयम सुटणार… तर कोण संयमाने खेळणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे.
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांना ‘बोचरी टाचणी’ हे नॉमिनेशन कार्य सोपवले होते. ज्यानुसार बझर वाजल्यानंतर फुगे फोडत सदस्यांना नॉमिनेट करायचे होते. तसेच कोण कोणाला नॉमिनेट करणार यावर सदस्यांमध्ये बरीच चर्चादेखील झाली. या कार्यामध्ये मेघा, आस्ताद, सई, शर्मिष्ठा, नंदकिशोर हे नॉमिनेट झाले होते.
त्यानंतर बिग बॉस यांनी पुष्करला एक विशेष अधिकार दिला ज्याद्वारे तो नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याला सुरक्षित करू शकतो आणि त्याने सईला सुरक्षित केले. त्यानंतर त्याला अजून एक अधिकार दिला ज्यानुसार त्याला एकाला घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी नॉमिनेट करायचे होते.
पुष्करने या अधिकाराचा फायदा घेत त्याने रेशमला नॉमिनेट केले. त्यामुळे या आठवड्यामध्ये कोण सुरक्षित होणार आणि कोण घराबाहेर जाणार हे पाहणे रंजक असणार आहे. आज बिग बॉस सदस्यांना ‘द ग्रेट डिक्टेटर’ हे कार्य सोपवणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका आज रात्री ९.३० वा. बिग बॉस मराठीमध्ये फक्त कलर्स मराठीवर.