निर्मलाच्या सत्याने प्रेक्षकांची उत्सुकता आधीच शिगेला पोहोचली आहे. अशातच आता भोसले वाड्यात सर्जेरावाच्या लग्नाचा घाट घातला गेल्यामुळे ‘युफोरिया प्रोडक्शन्स’च्या ‘चाहूल’ मालिकेला रोमांचकारी वळण लागले आहे. ‘चाहूल’ मालिकेला मिळणारी रसिक-प्रेक्षकांची पसंतीची पावती पाहता, निर्माते आरव जिंदल यांना आनंद झाला असून ते मालिकेच्या यशासाठी अधिक जोमाने कार्यरत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बालपणीच्या प्रेमाची चाहूल अजूनही सर्जेरावाला लागली नाही. निर्मलाच्या प्रेमाची सुतराम ही कल्पना नसणारा सर्जेराव मात्र जेनीसोबत आपली सात जन्माची गाठ बांधायला सज्ज झाला आहे. आता काय करणार निर्मला… भोसले वाड्यात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण रंगलं असताना निर्मला आता कुठली खेळी खेळणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

निर्मलाच्या प्रेमाची जाण सर्जेरावाला कधी होणार? सर्जेराव आणि जेनीचे लग्न होणार का? निर्मला कशी थांबवणार हा लग्न सोहळा? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ‘चाहूल’ च्या पुढच्या भागांमध्ये पहायला मिळतील. आरव जिंदल निर्मित विनोद माणिकराव दिग्दर्शित ‘चाहूल’ मालिकेतील अक्षर कोठारी आणि शाश्वती पिंपळीकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी कलर्स मराठीवर सोम. ते शनी. रात्री १०.३० वा. पहायला विसरू नका.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi serial chahool