सरस्वती मालिकेमध्ये दुर्गा आणि सरस्वतीच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच घटना घडल्या. सरस्वती– राघवची भेट होता होता राहणे, भुजंगचं सरस्वती आणि देवाशिषचे लग्न होत असतानाचं मोठे नाटक रचणे. भुजंग आतापर्यंत सगळी खेळी सफाईदारपणे खेळत आला आहे. पण आता येणाऱ्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना सरस्वती आणि मोठ्या मालकांमधील प्रेमाचे काही क्षण पाहता येणार आहेत. मोठे मालक म्हणजेच राघव जसा सरस्वतीवर प्रेम करायचा, तिची काळजी घ्यायचा हे सगळं पुन्हा एकदा घडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गोष्टी घडल्यानंतर सरस्वतीला आठवेल का की राघवच तिचा नवरा आहे? भुजंगची पत्नी ही सरू आहे हे सत्य राघवला कळेल का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक ज्या क्षणाची वाट बघत आहे ते आता घडणार आहे. सरस्वती आणि दुर्गा समोरासमोर येणार आहेत. हे सगळं पाहण्यासाठी कलर्स मराठीवर संध्याकाळई ७ वाजता सरस्वती मालिका पाहायला विसरू नका.

या आठवड्यात राघव सरस्वतीला रुग्णालयात घेऊन जाणार आहे. पण, राघव अनभिज्ञ आहे की, तो दुर्गाला नाही तर सरस्वतीलाच रुग्णालयात घेऊन जात आहे. जिथे त्याला हे सत्य कळणार आहे की, सरस्वती आता फक्त काही महिनेच आपल्यासोबत असणार आहे, जे ऐकून राघव पूर्णपणे खचून जाणार आहे. सरस्वती खूप मोठ्या प्रश्नात आहे की, राघव तिची इतकी सेवा, काळजी का करत आहे? तिला कुंकू लावणे, खाऊ घालणे. पण, येणारे पुढील भाग हे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे असतील यात काही शंका नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi serial saraswati