कलर्स मराठी वाहिनीवरील महारविवारच्या विशेष भागात मैत्री आणि प्रेमाच्या रंगांची उधळण होणार आहे. घाडगे & सून मालिकेत अक्षय आणि अमृताचे नाते नाजूक वळणावर येऊन पोहचले आहे. जिथे कियाराच्या खोट्या वागण्याने तिने अक्षयचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे आणि यामधून बाहेर येण्यासाठी अक्षय अमृतामध्ये कुठेतरी दुरावलेली मैत्री शोधू लागला आहे. पण, अमृताला अक्षयच्या मनाची घालमेल कळते आहे, अक्षयच्या वागण्यामागचे कारण मात्र होळीच्या दिवशी अमृताला कळले आहे. आता ती हे सत्य घरच्यांना आणि अक्षयला कसे सांगणार हा मोठा प्रश्न तिच्यासमोर आहे. याचबरोबर सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेत अनु सिद्धार्थच्या घरी येऊन गेली आहे. नेहा आणि सिद्धार्थच्या बोलण्यातून त्याला असे समजते की अनुला रंग खेळायला खूप आवडायचे. परंतु अवीच्या अचानक जाण्याने अनु आता रंगपंचमी साजरी करत नाही. रविवारी रंगपंचमी विशेष भाग रंगणार असून अनुच्या आयुष्यात सिद्धार्थ पुन्हा प्रेमाचा रंग आणू शकेल का, अक्षय – अमृता रंगपंचमी कशी साजरी करतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याचबरोबर ‘महाराष्ट्र जागते रहो’ या कार्यक्रमाचा देखील विशेष भाग रविवारी पाहायला मिळणार आहे. हे विशेष भाग येत्या रविवारी म्हणजे २४ मार्च रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा