कलर्स टीव्हीवरची लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’चा दुसरा सिझन या आठवड्याच्या सुरवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीला या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली होती. या मालिकेच्या पहिल्या सिझनमधे सिद्धर्थ शुक्ला, शशांक व्यास आणि अविका गौर प्रमुख भूमिका साकारत होते. आता नवीन सिझनच्या निमित्ताने या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच या मालिके बरोबरचा त्यांचा अनुभव देखील एका मुलाखतीत सांगितला आहे.

‘बालिका वधू १’मध्ये छोट्या आनंदीची भूमिका साकारणारी अविका गौर त्या वेळेस फक्त १० वर्षांची होती. अविकाने तिचा अनुभव सांगताना एका मुलाखतीत सांगितले की, “बालिका वधू ही मालिका माझ्यासाठी खूप खास आहे. या शोने मला आनंदी सारखी सुरेख भूमिका साकरण्याची संधी दिली. प्रेक्षकांना ती पटली, त्यांनी मला पसंत केलं. ही फक्त मालिका नाही तर एक भावना आहे. मी साकारलेल्या आनंदीला जितके प्रेम मिळाले तितकेच या नवीन आनंदीला देखील मिळेलं. तसंच मी या नवीन सिझनसाठी खूप उत्सुक आहे आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा देते”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

‘बालिका वधू’च्या पहिल्या सिझनमध्ये जग्गयाची भूमिका साकारणारा अभिनेता शशांक व्यासने सांगितले की, “बालिका वधू हा माझ्या करिअरचा बेस आहे, या मालिकेने मला खूप काही शिकवले. अजुनी ही या मालिकेचे शिर्षक गीत ऐकलं  की माझ्या जुन्या आठवणी ताज्या होतात. मी खूप नशीबवान आहे की मला या सगळ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली.

शिवची भूमिका साकारणारा सिद्धार्थ शुक्ला म्हणाला की, “बालिका वधू या मालिकेने माझ्या आयुष्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावली आहे. मी या मालिकेतून या क्षेत्रात पदार्पण केले. या इंडस्ट्रीमधील दिग्गज लोकांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. या मालिकेने एक इतिहास घडवला असून मला खूप आनंद होत आहे की या मालिकेचा दुसरा सिझन येत आहे. या मालिकेच्या पहिल्या सिझनने बाल विवाह विरोधात चांगली जागृती निर्माण केली होती. मात्र अजूनही  ही प्रथा सुरुच आहे, आपल्याला हा लढा सुरू ठेवायचा आहे. तसचं या नवीन सिझनसाठी टीमला शुभेच्या देतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

‘बालिका वधू’चा दूसरा सिझन गुजरात येथील एका गावमधील असून यात नवीन आनंदीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. या नवीन आनंदीचा प्रवास बाल अभिनेत्री श्रेया पाटील साकारताना दिसेल. ही कथा प्रेमजी आणि खीमजी नावाच्या  दोन मित्रांची आहे. जे त्यांची मैत्री घट्ट करण्यासाठी त्यांच्या मुलांचा बाल विवाह करतात. ‘बालिका वधू’या मालिकेचा दुसऱ्या सिझन ९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.