टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली महिला कॉमेडियन म्हणून भारती सिंह ओळखली जाते. ती अतिशय लोकप्रिय आहे. तिने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी भारती सिंहने पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीने याबाबतची माहिती दिली.
भारती सिंहने काल रात्री उशिरा तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत हर्ष आणि भारती दोघेही दिसत आहे. या फोटोसोबत तिने मुलगा झाला (It’s a Boy) अशी गुडन्यूज चाहत्यांपर्यंत शेअर केली आहे. या फोटोला कॅप्शन देतानाही भारती आणि हर्षने मुलगा झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. दरम्यान या दोघांनीही अद्याप बाळाचा एकही फोटो शेअर केलेला नाही.
वयाच्या ६० व्या वर्षी सैफ करतोय बाबा होण्याचा विचार? करीना कपूर सक्त ताकीद देत म्हणाली…
हर्ष आणि भारतीच्या या गोड बातमीनंतर अनेक कलाकारांसह चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अनिता हसनंदानी हिने अभिनंदन अशी कमेंट केली आहे. तर अभिनेता राहुल वैद्य याने अभिनंदन, त्याला पाहण्याची प्रतिक्षा आहे. त्यासोबतच करण जोहर, नेहा कक्कर, जय भानूशाली, अमृता खानविलकर, नेहा पेंडसे यांसारख्या विविध कलाकरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सिनेसृष्टीची ‘लाफ्टर क्वीन’
भारतीने तिच्या प्रेग्नेसींच्या नवव्या महिन्यापर्यंत हुनरबाज कार्यक्रम होस्ट केला होता. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात होते. विशेष म्हणजे तिने होणाऱ्या बाळाच्या नावासाठी काही पर्याय सुचवण्यासही सांगितले होते. त्यापूर्वी भारती ही ‘डान्स दीवाने’ शोच्या मंचावर पती हर्षसोबत धमाल करताना दिसत आहे.
भारतीने इंडियन लाफ्टर चॅलेंज या शो मधून करिअरला सुरुवात केली. या शोमध्ये भारतीने ‘लल्ली’ नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. या कॅरेक्टरने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून राज्य करत आहे.