गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन भारती सिंह ही चर्चेत आहे. या चर्चा भारतीने एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. त्यावेळी तिने कास्टिंग काऊचचा देखील अनुभव सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीने नुकतीच मनीष पॉलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने करिअरच्या सुरुवातील इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचचा अनुभव  सांगितले आहे. ‘मला कपिल शर्माकडून कळाले की ऑडिशन सुरु आहेत. मी तिथे जाण्यास तयार झाले. कपिलने मला या ऑडिशनविषयी सांगितले होते. मला कळाले होते की ऑडिशन घेणारी व्यक्ती मुलींसोबत चुकीच्या पद्धतीने वागते. ते ऐकून मला भीती वाटली होती. मी माझ्या एका मैत्रीणीसोबत ऑडिशन देण्यासाठी गेले’ असे भारती म्हणाली.

आणखी वाचा : Video: गाडी बंद न करताच हृतिक खाली उतरला अन्….

पुढे भारती म्हणाली, ‘ऑडिशनला जाण्यापूर्वी मी माझ्या मैत्रीणीला म्हणाले जर मी १५ मिनिटात बाहेर नाही आले तर पोलिसांना फोन करुन बोलाव. नंतर मी ऑडिशन देण्यासाठी गेले. एका खोलीमध्ये एक व्यक्ती बसली होती. त्या व्यक्तीने शॉर्ट आणि टीशर्ट परिधान केला होता. त्याने मला मी काय करते असे विचारले. मी ऑडिशन दिले. त्यानंतर घरी आले. मला त्या दिग्दर्शकाने फोन केला नाही. पण त्यानंतर मला लाफ्टर चॅलेंजमध्ये सहभागी होण्याची ऑफर आली होती.’

भारती सिंह तिच्या दिलखुलास आणि विनोदी अंदाजाने कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीने तिच्या विनोदी शैलीने अभिनय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ती सध्या पती हर्षसोबत ‘डान्स दीवाने’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedian bharti singh reveal the pain of casting couch in film industry avb