टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली फीमेल कॉमेडियन म्हणून भारती सिंह ओळखली जाते. ती अतिशय लोकप्रिय आहे. तिने २०१७मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. आता भारती आई होणार आहे. स्वत: भारतीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. सध्ये ती तिचा हा वेळ एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतंच भारतीने ख्रिसमसच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
भारती सिंह ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. ती नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. नुकतंच तिने तिचा आणि हर्षचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. यावेळी त्या दोघांनीही लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.
हा फोटो पोस्ट करताना भारतीने चाहत्यांना विचारले, सँटा येणार की सँटी? तुम्हाला काय वाटते, लवकर कमेंट करा आणि सांगा. त्यासोबत तिने हार्टवाली इमोजी देखील शेअर केला आहे. भारतीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केल्या आहेत.
“आता इतकी ओव्हरअॅक्टिंग का?” डान्सच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे ट्रोल
यावर अभिनेता करणवीर बोहराने कमेंट करत ‘मला सँटी पाहिजे’, असे सांगितले आहे. तर बिग बॉसची स्पर्धक आरती सिंह हिनेदेखील सँटीची मागणी केली आहे. त्यासोबतच अर्जुन बिजलानी यानेही ‘मुलगी हवी’ अशी कमेंट केली आहे. तसेच अली गोनी, कोरियोग्राफर टेरेन्स लुईस, गायक श्वेता पंडित आणि विंदू दारासिंह यांनीही कमेंट केली आहे.
सिनेसृष्टीची ‘लाफ्टर क्वीन’
सध्या भारती ‘डान्स दीवाने’ शोच्या मंचावर पती हर्ष लिम्बाचियासोबत धमाल करताना दिसत आहे. भारतीने इंडियन लाफ्टर चॅलेंज या शो मधून करिअरला सुरुवात केली. या शोमध्ये भारतीने ‘लल्ली’ नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. या कॅरेक्टरने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून राज्य करत आहे.