भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे ‘राहुल गंधी कपिल शर्माची जागा घेऊ शकतात’ हे टि्वट प्रसिद्ध स्टॅन्डप कॉमेडियन कपिल शर्माने रिटि्वट करताच त्याच्या चाहत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली. ‘राहुल बाबांची विनोदी विधाने पाहता, माझ्या मते टीव्हीवरील कपिल शर्माचा शो लवकरच बंद होऊ शकतो.’ अशी टि्वपण्णी नरेन्द्र मोदी यांनी रविवारी केली होती. कपिल शर्माने आता आपल्या टि्वटर अकाऊंटवरून मोदींचे छायाचित्र आणि टि्वट काढून टाकले असून, याविषयी तो म्हणतो, शोबाबतचे मोदींचे टि्वट मी शेअर केले, कारण तुम्ही सर्व या शोवर प्रेम करता. मला खूप वाईट वाटले असून, मी ते छायाचित्र आणि टि्वट काढून टाकले आहे. कपिल शर्माने मोदींचे टि्वट शेअर करताच चाहत्यांच्या शिवराळ आणि नकारात्मक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. कपिलने चाहत्यांना संबोधून टि्वटरवर संदेश प्रसिद्ध केला असून, त्यात तो म्हणतो, हॅलो फ्रेन्डस्… सोशल नेटवर्किंग साईटवर तुम्हाला भांडताना पाहून खूप दु:ख होते आहे… वाईट शब्द… शिवराळ भाषा… हे खरोखरी खूप दुःखद आहे… माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे… कृपया धर्माच्या नावावर एकमेकांसाठी अशा वाईट शब्दांचा वापर करू नका… कोणताही धर्म आपल्याला अन्य धर्मासाठी शिवराळ भाषेचा वापर अथवा अनादर करण्यास शिकवत नाही… कृपया या सर्वातून बाहेर या… आपण सर्व मानवजातीशी निगडीत आहोत… मी मोदींचे शोबाबतचे टि्वट शेअर केले कारण तुमचे शोवर प्रेम आहे… मला खूप वाईट वाटल्याने मी ते छायाचित्र आणि टि्वट काढून टाकले आहे… एकमेकांवर प्रेम करायला शिका… एकमेकांचा आदर करायला शिका… चला या जगात बदल घडवून आणूया… ज्यायोगे ” हमारे बाद जो जनरेशन आये… उन्हे नफरत का पता ही न हो. गॉड ब्लेस धिस ब्युटीफूल वर्ल्ड… किप स्मायलिंग… लव्ह यू ऑल”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा