प्रसिद्ध हास्यकलाकार आणि ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या हास्य-विनोदी शोचा सुत्रसंचालक कपिल शर्मा लवकरच बॉलिवूडपटात काम करताना नजरेस पडणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अब्बास-मस्तानचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात कपिल शर्मा माजी मिस इंडिया सिमरन कौरबरोबर मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दृष्टिस पडेल. टीव्हीवरील ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या त्याच्या प्रसिद्ध शोमुळे कपिल या अगोदरच अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. आता ‘प्रेक्षक कॉमेडी नाईट्स…’ शोप्रमाणेच कपिलच्या चित्रपटालादेखील पसंती देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कपिलचा हा पहिलाच बॉलिवूडपट असणार आहे. तर, सिमरननेदेखील या आधी फक्त तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमधून भूमिका साकारली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-10-2014 at 06:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedian kapil sharma will be seen doing romance with former miss world simran kaur