स्टॅंडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी(२१ सप्टेंबर) रोजी सकाळी दहा वाजून २० मिनिटांनी निधन झाले. २२ सप्टेंबरला त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप देताना मित्रपरिवार आणि चाहत्यांना अश्रु अनावर झाले होते.
राजू श्रीवास्तव यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांचं कुटुंब मुंबईत परतणार आहेत. रविवारी(२५ सप्टेंबर) रोजी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी मुंबईत शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात संध्याकाळी चार ते सहा वेळेत ही शोकसभा होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
हेही वाचा >> सिनेमाच घडतोय जॉनी डेपच्या आयुष्यात; अँबर हर्डशी घटस्फोटानंतर पडला वकिलाच्या प्रेमात
हेही वाचा >> Video : “चित्रपट प्रदर्शित झाला, पैसे मिळाले…”, ‘त्या’ कृतीमुळे आलिया-रणबीर ट्रोल, व्हिडीओ व्हायरल
राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ४० दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. परंतु, ही झुंज अपयशी ठरली आणि २१ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते.
हेही पाहा >> Raju Srivastava Death : किती संपत्ती सोडून गेले ‘गजोधर भैय्या’?
हेही वाचा >> मृणालचा ‘सिता रामम्’ पाहून कंगना रणौत भारावली, म्हणाली “ठाकूर साहेब…”
राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी अभिनयशैलीने प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. ते एक प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमधून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय ते ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा हिस्साही राहिले आहेत. त्यांनी चित्रपटात साकारलेल्या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटात त्यांनी काम केले.