कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. श्रीवास्तव यांना पुन्हा व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. ताप १०० डीग्रीपेक्षा जास्त वाढल्यानं त्यांची प्रकृती पुन्हा एकदा ढासळली आहे. जीममध्ये व्यायाम करताना १० ऑगस्टला श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १५ दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर श्रीवास्तव शुद्धीवर आले होते. मात्र, आता परत त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“ते ९ दिवस…” अमिताभ बच्चन यांची करोनावर मात, लवकरच केबीसीच्या मंचावर परतण्याचे दिले संकेत

श्रीवास्तव सध्या शुद्धीवर असून त्यांच्या हातापायांच्या हालचाली अत्यंत धीम्यागतीनं सुरू आहेत, अशी माहिती राजू श्रीवास्तव यांचा जनसंपर्क सांभाळणारे गर्वित नारंग यांनी दिली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यापासून राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत. २५ ऑगस्टला शुद्धीवर आल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, आता परत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

आपल्या विनोदाने लोकांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव गंभीर आजाराशी झगडत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी त्यांचे चाहते आणि कुटुंबीय प्रार्थना करत आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रीवास्तव यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत चालली आहे.

कॉमेडी किंग भाऊ कदम झळकणार दुहेरी भूमिकेत, पोट दुखेपर्यंत हसवणारा ‘घे डबल’चा टीझर पाहिलात का?

काही दिवसांपूर्वी उपचाराचा भाग म्हणून श्रीवास्तव यांना महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकवला जात होता. न्यूरोफिजियोथेरेपी या उपचार पद्धतीत रुग्णांना त्यांच्या आवडत्या लोकांचा आवाज ऐकवला जातो जे त्यांच्या फार जवळ असतात. त्या आवाजामुळे रुग्णाची हरपलेली शुद्ध परत येते, असे म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांना एक व्हाईस नोट देखील पाठवली होती. “उठ राजू आणि लोकांना पुन्हा हसायला शिकव…” असे या नोटमध्ये महानायकाने लिहिले होते.