Legendary Comedian Raju Srivastava Died at 58 : आपल्या खुसखुशीत विनोदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये फक्त ५० रुपयांमध्ये त्यांनी विनोदी कार्यक्रम केले. पण त्यानंतर अधिकाधिक मेहनत करत त्यांनी कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्याचबरोबरीने त्यांची आर्थिक बाजूही अधिक बळकट होत गेली.
सुप्रसिद्ध विनोदी कलाकार अशी राजू श्रीवास्तव यांची ओळख होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका स्टेज शोसाठी ते ४ ते ५ लाख रुपये मानधन घ्यायचे. त्याचबरोबरीने सुत्रसंचालन, जाहिराती तसेच चित्रपटांमध्येही ते काम करत होते. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार राजू श्रीवास्तव यांची एकूण संपत्ती २० कोटी रुपये इतपत आहे. शिवाय त्यांचं स्वतःचं अलिशान घरदेखील आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच कानपूर येथे सुंदर घरदेखील बांधलं होतं.
राजू श्रीवास्तव यांचे कार कलेक्शन
राजू श्रीवास्तव यांना गाड्यांची आवड होती. त्यांच्याजवळ एकापेक्षा एक महागड्या गाड्या आहेत. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये इनोवा, बीएमडब्ल्यु ३ आणि ऑडी क्यू ७चा समावेश आहे. पण आपल्याकडील संपत्तीचा त्यांनी कधीच दिखावा केला नाही. नेहमीच एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे ते जगत राहिले.
आणखी वाचा – Comedian Raju Srivastava : राजू श्रीवास्तव गेले ४० दिवस शुद्धीवर आलेच नाहीत, रुग्णालयामध्ये नेमकं काय घडलं?
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँडअप कॉमेडी शोने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. ते या कार्यक्रमाचे उपविजेता ठरले होते. ‘गजोधर भैया’ हे त्यांनी साकारलेलं पात्र सुपरहिट ठरलं. याव्यक्तिरिक्त त्यांनी अमिताभ बच्चन, लालू प्रसाद यादव, राम देव बाबा यांच्या नकला करून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. तसेच त्यांनी ‘शक्तीमान’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी का महा मुकाबला’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ इत्यादी टीव्ही मालिकांमध्ये काम केलं.