Legendary Comedian Raju Srivastava Died at 58 : आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना लगेचच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. गेले ४० दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या प्रकृतीबाबत सतत त्यांचे कुटुंबीय माहिती देत होते. पण या ४० दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये नेमकं काय घडलं? हे आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयामध्ये भरती केल्यानंतर लगेचच त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. १० ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. यादरम्यान ते अचानक खाली कोसळले. रुग्णालयामध्ये भरती केल्यानंतर त्यांची प्रकृती आणखीनच खालावत गेली. हळूहळू त्यांच्या मेंदूनेही काम करणं बंद केलं. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी राजू यांच्या व्हेंटिलेटरचा पाइप देखील बदलला. त्यांना इन्फेक्शन होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. शिवाय राजू यांना कोणत्याच प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून पत्नी शिखा आणि मुलगी अंतरालाही त्यांना भेटता येत नव्हतं. राजू यांना मध्येच ताप देखील येत होता.

आणखी वाचा – Raju Srivastava Passes Away : स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

काही दिवसांपूर्वी राजू यांना शुद्ध आली असल्याच्या चर्चा होत्या. पण अफवांवर विश्वास ठेवू नका असं स्पष्ट शब्दांमध्ये त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. याबाबत त्यांच्या मुलीने एक पोस्टदेखील शेअर केली होती. “माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे. हळूहळू त्यांच्यामध्ये सुधारणा होत आहे. सध्यातरी ते व्हेंटिलेटरवरच आहेत.” असं त्यांच्या मुलीने सांगितलं होतं. तसेच त्यांच्या पत्नीनेसुद्धा राजू यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. “सध्यातरी ते व्हेंटिलेटरवरच आहेत. डॉक्टरांची संपूर्ण टीम अधिकाधिक मेहनत करत आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेची गरज आहे.” असं त्यांच्या पत्नीने म्हटलं होतं.

आणखी वाचा – राजू श्रीवास्तव यांच्या उत्तम आरोग्यासाठी कुटुंबीय करताहेत सलग दोन दिवस पूजा, नवी माहिती समोर

राजू श्रीवास्तव यांच्याकडून कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद डॉक्टरांना मिळत नव्हता. त्यामुळे व्हेंटिलेटरवरच त्यांना ठेवण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून राजू यांच्या कुटुंबियांनी सलग तीन दिवस घरी पूजेचं आयोजन केलं होतं. पण डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने अधिक मेहनत करूनही राजू श्रीवास्तव यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली.