सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर आज दिल्लीमधील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या कलाकाराला शेवटचं पाहण्यासाठी चाहत्यांना मोठी गर्दी केली होती. तसेच याक्षणी त्यांच्या कुटुंबियांनाही अश्रू अनावर झाले. राजू श्रीवास्तव यांना कलाविश्वातील दिग्गज मंडळींनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली. तसेच काही कलाकार मंडळी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी दिल्ली येथे पोहोचले. आपल्या वडिलांना मिळालेलं प्रेम पाहून राजू श्रीवास्तव यांची लेक भावुक झाली आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची लेक अंतरा श्रीवास्तव हिने वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर केली आहे. ज्या व्यक्तींनी राजू श्रीवास्तव यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली त्यांच्याबाबत तिने इन्स्टा स्टोरीद्वारे पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री जुही बब्बर, निर्माते कहरी बब्बर तसेच अन्य काही मंडळींनी राजू श्रीवास्तव यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. याच मंडळींना “धन्यवाद” म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे. आपल्या वडिलांची लोकप्रियता पाहून ती अगदी भारावून गेली. राजू श्रीवास्तव यांच्यावर अंत्यसंस्कार कधी करण्यात येणार? याबाबतही अंतराने पोस्ट शेअर करत माहिती दिली होती.

राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यसंस्कारला फक्त त्यांचा भाऊ काजू श्रीवास्तव पोचू शकला नाही. त्याची प्रकृती ठिक नसल्याने त्याला कानपूरहून दिल्लीला पोहोचणं शक्य नव्हतं. राजू यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांनी मात्र मोठी गर्दी केली होती.

Story img Loader