स्टॅंडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी(२१ सप्टेंबर) रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. महिनाभराहून अधिक काळ त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. परंतु, त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनानंतर सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेता शैलेश लोढा यांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी खास पोस्ट लिहली आहे.
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम अभिनेता शैलेश लोढा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून राजू श्रीवास्तव यांचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राजू श्रीवास्तव यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “आमच्यात फार काळापासून मैत्री होती. स्टार प्लसवरील एका कॉमेडी शोमध्ये राजू माझ्या बरोबर होते. या शोच्या अंतिम सामन्यात त्यांनी एक पात्र साकारलं होतं. हे पात्र साकारताना ते ‘आओ आओ’ हे फारच मजेशीर पद्धतीने बोलायचे. तेव्हापासून माझ्या फोनमध्ये त्यांचा नंबर ‘राजू आओ आओ’ या नावाने मी सेव्ह केलेला आहे. आज सगळे हेच म्हणत आहेत राजू परत ये”, अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे.
हेही वाचा >> Koffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”
हेही पाहा >> Raju Srivastava Death : किती संपत्ती सोडून गेले ‘गजोधर भैय्या’?
शैलेश लोढा यांनी पोस्टमध्ये पुढे “उत्तम कलाकार, कमालीचा मित्र…राजू तुम्ही अशाप्रकारे आम्हाला रडवून जाल याचा कधीच विचार केला नव्हता. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये तुमच्या कुटुंबियांशी भेट झाली. तेव्हा तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, असा विश्वास होता. परंतु, तुम्ही अनंतात विलीन झालात. तुमच्यासारखा विनोदी कलाकार पुन्हा होणे नाही”, असं म्हणत त्यांनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा >> सोनम कपूरने लाडक्या लेकासाठी सजवली रूम, खास फोटो पाहिलात का?
राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर गुरूवारी(२२ सप्टेंबर) रोजी दिल्लीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्यांनाही अश्रू अनावर झाले.