प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी (२१ सप्टेंबर) सकाळी दहा वाजून २० मिनिटांनी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. आज दिल्लीमधील निगमबोध घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. तसेच चाहत्यांनी देखील आपल्या लाडक्या कलाकाराला शेवटचं पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कलाक्षेत्रामधील काही मंडळीही यावेळी उपस्थित होती.

आज सकाळी राजू श्रीवास्तव यांचं पार्थिव त्यांच्या भावाच्या घरी नेण्यात आलं. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास राजू श्रीवास्तव यांच्या अंतिम यात्रेला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली होती. राजू श्रीवास्तव यांचं पार्थिव ज्या गाडीमध्ये ठेवण्यात आलं त्या गाडीला बाहेरून फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच यावर त्यांचा फोटोदेखील होता.

पाहा व्हिडीओ

राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्यांनाही अश्रू अनावर झाले. राजू यांना शेवटचं पाहण्यासाठी कानपूरहून त्यांची मित्र-मंडळी दिल्ली येथे पोहोचली होती. सुनिल पाल, मधुर भंडारकर आदी कलाक्षेत्रामधील मंडळीदेखील यावेळी उपस्थित होती. तसेच या दुःखद क्षणी राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय एकमेकांना आधार देत होते.

आणखी वाचा – Video : राजू श्रीवास्तव यांच्याबाबत प्रश्न विचारताच तापसी पन्नूचा राग अनावर, अभिनेत्रीचं उत्तर ऐकून नेटकरीही संतापले

१० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना लगेचच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. गेले ४० दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या प्रकृतीबाबत सतत त्यांचे कुटुंबीय माहिती देत होते. पण बुधवारी सकाळी राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेत सगळ्यांचा निरोप घेतला.

Story img Loader