सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांनी २१ सप्टेंबर रोजी सकाळी दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मनोरंजन विश्वासाला दुःखद धक्का बसला. तसेच संपूर्ण श्रीवास्तव कुटुंबीय कोलमडून गेलं आहे. रविवावारी (२५ सप्टेंबर) राजू श्रीवास्तव यांच्या शोकसभेचं मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या शोकसभेदरम्यान मात्र राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला रडू कोसळलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : राजू श्रीवास्तव यांच्याबाबत प्रश्न विचारताच तापसी पन्नूचा राग अनावर, अभिनेत्रीचं उत्तर ऐकून नेटकरीही संतापले

राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला अश्रू अनावर
राजू श्रीवास्तव यांच्या शोकसभेला जॉनी लिवर, सुनील पाल, कपिल शर्मा, भारती सिंह, कीकू शारदा, शैलेश लोढा यांसारख्या अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. यादरम्यानचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले असल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला शोकसभेदरम्यान दोन शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली. आपल्या पतीबाबत बोलताना त्या ढसाढसा रडू लागल्या. त्या म्हणाल्या, “काय बोलू? बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नाहीत. माझं तर संपूर्ण आयुष्यच संपल आहे. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. सगळ्यांनी प्रार्थना केली. त्यांनी सगळ्यांना खूप हसवलं आणि आता देवाघरी जावून तिथे सगळ्यांना ते हसवत असतील. आम्हाला पाठींबा दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.”

आणखी वाचा – कुटुंबीय, चाहत्यांची गर्दी जमली पण…; राजू श्रीवास्तव यांचा भाऊ अंत्यसंस्काराला पोहोचलाच नाही, यामागचं कारण काय?

तसेच राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने त्यांच्या कुटुंबियांचे व मित्र परिवाराचेही आभार मानले. यानेवी अभिनेते जॉनी लिवरदेखील भावुक झाले होते. राजू श्रीवास्तव जॉनी लिवर यांच्या शेजारी राहायचे. याबाबत त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedian raju srivastava prayer meet in mumbai wife shikha gets emotional video goes viral on social media kmd