आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता अली असगर गेली अनेकवर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातून त्याला एक वेगळी ओळख मिळाली, त्यातील ‘दादी’ हे त्याने रंगवलेलं पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. दादी हे पात्र लोकप्रिय झालं खरं मात्र या पात्राबद्दल त्याच्या मुलांना त्रास सहन करावा लागला होता. सध्या ‘झलक दिखला जा १० मध्ये नाचताना दिसत आहे. नुकताच या शोच्या पुढच्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. यामध्ये अली असगर त्याच्या मुलीचा व्हिडीओ पाहून भावूक झाला.

या कार्यक्रमात अली असगरला त्याच्या मुलाचा आणि मुलीचा व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये अलीच्या मुलीने सांगितलं की ‘माझे वडील विनोदी कलाकार आहेत म्हणून शाळेत चिडवलं जातं. चिडवणाऱ्या त्या लोकांना माहीत नाही की ते स्वतःचीच चेष्टा करत आहेत, कारण माझे वडील इतरांना हसवण्याचं काम करतात’, तसेच ती पुढे म्हणाली की ‘आमच्या हातावर दादी की बेटी असे टॅटू काढले जात होते’. आपल्या मुलीचे हे शब्द ऐकून अली असगरचे डोळे पाणावले होते.

शाहरुख खान बरोबर माझी तुलना करणे… ” दाक्षिणात्य अभिनेता दुलकर सलमानने दिली प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर परीक्षक असलेल्या माधुरी दीक्षितच्या डोळ्यात पाणी आलं, आम्ही सर्व तुझ्यावर प्रेम करतो असं माधुरी अलीला म्हणाली. पतसेच माधुरीने अली असगरचं कौतुक केले. अली असगर एक उत्तम नकलाकारदेखील आहे. १९८७ मध्ये ‘एक दो तीन चार’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केलं. यानंतर त्याने ‘इतिहास’, ‘कहानी घर घर की’, ‘कुटूंब’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘एफआयआर’, ‘जिनी और जुजू’, ‘कानपूर वाले खुराना’ आणि ‘अकबर का बल बिरबल’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं.

टीव्हीवर झळकल्यानंतर १९९१ मध्ये आलेल्या ‘शिकारी’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याने ‘जान तेरे नाम’, ‘चमत्कार’, ‘खलनायक’, ‘जोरू का गुलाम’, ‘जोश’, ‘हम किसी से कम नहीं’, ‘ऐतबार’, ‘शादी नंबर १’, ‘पार्टन’र, ‘संडे’, ‘जुडवा २’, ‘पागलपंती’ आणि ‘अमावस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. सचिन पिळगावकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’ या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून तो दिसला होता.

Story img Loader