‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’या गाजलेल्या टीव्ही कार्यक्रमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने तिच्या लग्नाचे वृत्त स्पष्ट शब्दांत फेटाळले. अभिनेत्री काजोल हिचा चुलत भाऊ सम्राट मुखर्जी याच्यासोबत सुमोना लग्न करणार असल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. पण ‘दुबई रेडिओ’शी बोलताना सुमोनाने ते स्पष्टपणे फेटाळले असून, तूर्ततरी आपला लग्न करण्याचा विचार नसल्याचे म्हटले आहे.
सुमोना सम्राटसोबत डेटिंग करीत असल्याचे आणि हे दोघेही लवकरच लग्न करण्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. सम्राट सुमोनापेक्षा ११ वर्षांनी मोठा आहे. अनेक बंगाली चित्रपटांमधून काम केलेल्या सम्राटची तेथील आघाडीचा नायक अशी ओळख आहे. माझी सम्राटसोबत मैत्री आहे पण त्याच्याशी लग्न करण्याचा काहीही ठरवले नसल्याचे तिने म्हटले आहे.
‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये सुमोनाने कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. आता कपिल शर्मा नव्याने घेऊन येत असलेल्या ‘द कपिल शर्मा शो’मध्येही सुमोना दिसणार आहे.

Story img Loader