कॉमेडी क्वीन नम्रता संभेराव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आली. तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वातही ती तितकीच धमाल करते. चक्क अभिनेते जॉनी लिवरदेखील तिचे फॅन आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्रीचा अगदी सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला. चाळीमध्येच ती लहानाची मोठी झाली. याबाबत तिने स्वतःच इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – राहायला घर, पैसे नाही अन् उपाशी पोटी झोपली सनी देओलच्या चित्रपटामधील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “मला अजूनही…”

काळाचौकी-लालबागबाबत काय बोलली नम्रता संभेराव?
नम्रता खऱ्या आयुष्यात एक पत्नी, मुलगी, आई आणि मैत्रीण म्हणून उत्तम भूमिका निभावते. पण सगळ्या जबाबादाऱ्या सांभाळत असताना आपल्या कामाबाबत ती एकनिष्ठ आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये एकापेक्षा एक वेगवेगळे पात्र नम्रता अगदी उत्तमरित्या साकारते. प्रत्येक पात्र अगदी परफेक्ट आणि योग्य पद्धतीने साकारणं तुला कसं काय जमतं? असा प्रश्न इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये नम्रताला तिच्या एका चाहत्याने विचारण्यात आला.

नम्रता म्हणाली, “माझी निरीक्षण शक्ती खूप चांगली आहे. शिवाय मी आधी चाळीमध्येच राहत होते. लालबाग-काळाचौकी येथे माझं माहेर. या परिसरामध्येच मी वाढले. त्यामुळे तिथे आजूबाजूला जे लोक असायचे ते पाहूनच मी आता माझ्या पात्रांमध्ये नवनवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करते.”

आणखी वाचा – Koffee With Karan 7 : “डेविड धवन यांना डेट करत होतास का?” विचारलेल्या प्रश्नावर करण जोहर म्हणाला….

ती पुढे म्हणाली, “लॉली हे पात्र साकारण्यामागे माझा एकटीचा वाटा नाही. यामध्ये सचिन गोस्वामी, सचिन मोटे तसेच प्रसाद खांडेकरचा खारीचा वाटा आहे.” नम्रता साकारत असलेलं लॉली हे पात्र तर महाराष्ट्रभर गाजत आहे, खरंच नम्रता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये साकारत असलेले पात्र अगदी लोकप्रिय आणि चर्चेचा विषय ठरतात.