गेल्या वर्षी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षितपणे यश मिळवत तब्बल १०० कोटींची कमाई केली. या चित्रपटामधील राजकुमारने केलेल्या भूमिकेचं सर्व स्तरामधून कौतुक करण्यात आल्या. विशेष म्हणजे या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर राजकुमार पुन्हा एकदा नवीन हॉरर कॉमेडी चित्रपट करण्यास सज्ज झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

‘रुह अफ्जा’ असं राजकुमारच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते दिनेश विजन आणि राजकुमार पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली होती. मात्र चित्रपटाचं नाव निश्चित झालेलं नव्हतं. त्यानंतर आता हे नाव निश्चित झाल्यानंतर अधिकृतपणे चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

‘स्त्री’ प्रमाणेच ‘रूह अफ्जा’ हादेखील एक भयपट असून या चित्रपटातून राजकुमार राव प्रेक्षकांना घाबरवणार आहे. या भितीला विनोदाचा तडकादेखील असणार आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनामध्ये कोठेही कमी पडायला नको यासाठी निर्मात्यांनी वरुण शर्मा या दिग्गज कॉमेडी स्टारलाही चित्रपटात कास्ट केलं आहे. वरुणने यापूर्वी फुकरे या चित्रपटात काम केलं आहे.

दरम्यान, या चित्रपटात उत्तर प्रदेशातील मुरादाबादची कथा दाखवण्यात येणार असून राजकुमारच्या अपोझिट कोणती अभिनेत्री झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. लवकरच त्याचीही घोषणा होईल, असं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त राजकुमार मेड इन चायना, मेंटल है क्या या चित्रपटांत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.