छोटय़ा पडद्यावर सध्या विनोदी मालिका आणि त्यातील कलाकारांनी एकच धमाका उडवून दिला आहे. ‘सब’सारखी एक संपूर्ण वाहिनी आज विनोदी मालिकांना वाहिलेली आहे. ‘कलर्स’पासून ‘झी मराठी’पर्यंत सर्वत्र विनोदी कलाकारांचा बोलबाला आहे. नाही, तेच सध्या या वाहिन्यांचे ‘स्टार’ कलाकार आहेत. या दिवाळीत तर ‘झी मराठी’वर ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत घुसलेल्या विनोदवीरांनी धमाका उडवून दिला. ‘सब’च्या सगळ्याच कलाकारांनी आपल्या मालिकेतून दिवाळीची विनोदी बहार उडवून दिली आहे. डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे या कलाकारांपासून ते कृष्णा अभिषेक, भारती सिंग, किू कू शारदा, दीक्षा वखानी असे कित्येक कलाकार घराघरात ओळखले जातात. विनोदी कलाकार आणि मालिकांना प्रेक्षकांकडून भरभरून मिळणाऱ्या या प्रतिसादाबद्दल या कलाकारांनाच नेमकं काय वाटतं आहे आणि या बदलामागची त्यांना जाणवणारी कारणं त्यांच्याच शब्दांत..
चिंता वाढल्या की विनोद जवळचा वाटतो..
विनोदी मालिकांचे प्रमाण वाढण्यामागचे खरे कारण तपासले तर लक्षात येईल की, जेव्हा आपल्या चिंता वाढतात तेव्हाच आपल्याला विनोद जवळचा वाटू लागतो. माणूस जेव्हा चिंतेत असतो तेव्हा एकतर तो गाणी गातो किंवा विनोदांना आपलेसे करतो. आज कित्येकदा आयटी क्षेत्रामधील मुले येऊन आम्हाला सांगतात की, ऑफिसमधील कामामुळे आम्हाला टीव्ही पाहायचा वेळ मिळत नाही. पण, यूटय़ूबवर तुमच्या कार्यक्रमांचे
डॉ. नीलेश साबळे चला हवा येऊ द्या
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा