रेश्मा राईकवार
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर भाष्य करताना त्याविषयी नुसताच तक्रारीचा सूर न लावता त्याला रंजक नाटय़ाची फोडणी देत केवळ मुलांनाच नव्हे तर समाजालाच अनुभवी पिढीचं मोल उलगडून सांगण्याचा प्रयत्न लेखक – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटातून केला आहे. अर्थात, या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन हे शिवधनुष्य पेलतानाच मध्यवर्ती भूमिकेची जबाबदारीही त्यांनीच घेतली असल्याने हा चित्रपट म्हणजे सबकुछ महेश मांजरेकर असा अनुभव देतो.

‘लहानपणी ज्यांचं बोट धरून आम्ही त्यांना चालायला, पुढे जायला शिकवतो त्याच मुलांना आपले वयस्कर आईबाप ओझं वाटायला लागतात’ अशा आशयाचा एक संवाद ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा गोविंद पाठक (महेश मांजरेकर) यांच्या तोंडी आहे. या चित्रपटाची कथा-कल्पना लेखनात उतरवताना टाकून दिलेले आई वडील, त्यांना त्रास देणारा मुलगा-सून असा एकूणच विरोधी सूर चित्रपटाला येऊ नये हा आग्रह त्याच्या मांडणीत दिसतो. त्यामुळे दोन पिढय़ांमधील या संघर्षकथेतला तोचतोचपणा आपल्याला जाणवत नाही. त्याउलट, वास्तवाची जाण असलेला, आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करणारा पण खमक्या वृत्तीचा, सत्याने वागणारा एक बाप, एक पती, एक प्रामाणिक व्यक्ती मध्यवर्ती भूमिकेत ठेवून त्याच्या नजरेतून वयस्कर लोकांकडे एकूणच समाजाचं होणारं दुर्लक्ष यावर भाष्य करण्याचा प्रयत्न लेखक – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केला आहे. मांजरेकरांच्या चित्रपटांची कथा साध्यासरळ रेषेवरून जाणाऱ्या नसतात, त्यामुळे इथेही आई-वडील आणि मुलाच्या नात्याची गोष्ट नाटय़मय वळणं घेतच आपल्यापर्यंत पोहोचते.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Paaru
Video: पारू व आदित्यच्या मैत्रीत फूट पाडण्यात अनुष्का यशस्वी होणार का? पाहा ‘पारू’ मालिकेचा प्रोमो
Saleel Kulkarni Share Special Post For Devendra Fadnavis of New Chief Minister Of Maharashtra
“एखाद्याने स्वप्न पाहावे आणि पूर्ण करावे तर असे”, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानिमित्ताने सलील कुलकर्णींची खास पोस्ट, म्हणाले…

हेही वाचा >>>कुशल बद्रिकेला बायकोनं लावलं कामाला, फोटो शेअर करत म्हणाला, “एका भांडणात….”

गोविंद आणि सुहासिनी पाठक हे दाम्पत्य. त्यांच्या छोटेखानी घरात राहत आहेत. त्यांचा मुलगा अभय हा प्रतिष्ठित मंत्र्याचा सचिव म्हणून काम पाहतो आहे. गर्भश्रीमंत घरातील अवनीशी त्याचं लग्न झालेलं आहे. अभय अधूनमधून आई-वडिलांना भेटतो, त्यांना खर्चासाठी पैसे देतो. आई – वडिलांचे पैसे त्याने त्यांच्या भविष्याचा विचार करत योग्य जागी गुंतवले आहेत, त्यामुळे त्यांची आर्थिक खाती तो सांभाळतो, त्यांना देत नाही. सगळं चांगल्या हेतूनेच करणाऱ्या आपल्या मुलाच्या हलगर्जीपणामुळे त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करत गोिवद पाठक मुलाला न्यायालयात खेचतात. त्याच्यावर केलेल्या खर्चापोटीची रक्कम व्याजासकट नुकसानभरपाई म्हणून आपल्याला मिळावी, असा दावाही करतात. हा चित्रपट पूर्णपणे न्यायालयात घडणाऱ्या नाटय़ावर बेतलेला आहे. अभय मुलगा म्हणून वाईट नाही. तो त्यांना शारीरिक-मानसिक त्रास देत नाही वा छळवणूक करत नाही. तो त्यांच्याकडे कधीच ढुंकूनही बघत नाही असंही नाही किंवा तो आई – वडिलांचा मनापासून राग करणाराही मुलगा नाही. मात्र कळत-नकळत करिअरमागे धावताना आई – वडिलांबरोबरचा त्याचा संवाद हरवत गेलेला आहे. आई वडिलांना आपल्या मुलाच्या मायेची, आपुलकीची गरजही तितकीच असते. वयस्कर लोक हे टाकाऊ असतात, त्यांचा आपल्याला काही उपयोग नाही म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची समाजामध्ये बळावत चाललेल्या वृत्तीवर हा चित्रपट प्रामुख्याने भाष्य करतो.

महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाची आक्रमक, नाटय़मय शैली ‘जुनं फर्निचर’ पाहतानाही पहिल्या दृश्यचौकटीपासून जाणवते. मात्र मुळात या विषयाची मांडणी करताना त्यांनी गोिवद आणि सुहासिनी पाठक या वयस्कर दाम्पत्याच्या नात्यावर सुरुवातीला अधिक भर दिला आहे. या पती-पत्नीचे एकमेकांवरचे प्रेम, त्यांच्यात असलेलं समंजस नातं याची जाणीव पहिल्या काही दृश्यात होते. मुलगा फोन करत नाही, त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाला बोलवत नाही या मनाला टोचणाऱ्या गोष्टींवर दोघंही आक्रोश करत नाहीत. एकमेकांची समजूत काढत होणाऱ्या या गोष्टीला एका घटनेने कलाटणी मिळते. आणि मग गोविंद पाठक आपल्या मनातील राग, नाराजीला कायदेशीर मार्गाने वाट मोकळी करून देतात. न्यायालयात घडणारं नाटय़, एकमेकांमधले दावे-प्रतिदावे हे संवादापेक्षा गोिवद पाठक या मुख्य व्यक्तिरेखेसह त्यांच्या विरोधात अभयचा खटला लढवणारे वकील बापट (गिरीश ओक), पाठक यांचे सहकारी वकील पंडित, न्यायाधीश अशा मोजक्या व्यक्तिरेखांच्या स्वभावाचे कंगोरे, खटला सुरू असताना त्यांच्यात होणारे सवाल-जवाब यातून रंगवत नेलं आहे. मुळात आपण खूप काही वेगळं सांगतो असा अभिनिवेश चित्रपटात नाही. आणि कटू चित्र रंगवतानाही भडक भावनाटय़ न रंगवता रंजकतेने साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे तुकडय़ा-तुकडय़ातील काही प्रसंग अधिक उठावदार झाले आहेत. सलग चित्रपट पाहणं कंटाळवाणं वाटत नाही. त्यात या कलाकारांच्या अभिनयाचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: जहांगीर हे नाव आलं कुठून? त्या मागचा इतिहास काय सांगतो?

गोिवद पाठक ही भूमिका महेश मांजरेकर यांनीच साकारली आहे. महेश आणि मेधा मांजरेकर ही पडद्यावरची जोडी नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळवते, इथेही ती मिळते. अभयच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न अभिनेता भूषण प्रधान याने केला आहे. मात्र अभय, त्याची पत्नी अवनी, तिचे वडील या सगळय़ाच व्यक्तिरेखांना फार वाव मिळालेला नाही. त्या तुलनेत मांजरेकर यांच्याबरोबर न्यायाधीशांच्या भूमिकेत सचिन खेडेकर, गिरीश ओक आणि भोपेच्या भूमिकेतील उपेंद्र लिमये अधिक लक्षात राहतात. गोविंद पाठक हेच चित्रपटाचे मुख्य नायक आहेत. सगळा भार या व्यक्तिरेखेवर असल्याने तो काहीसा एकांगी अनुभव वाटल्याशिवाय राहात नाही. मात्र अडगळीत टाकलेल्या गोष्टी टाकाऊ नसतात, तसंच घरातल्या जाणत्यांबरोबरच्या आपल्या नात्यांचं झालं आहे. ती नाती जरा घासूनपुसून घेतली तर जुन्या फर्निचरप्रमाणे लखलखून निघतील या कथासूत्राला धरून केलेल्या मांडणीमुळे चित्रपट रंजक अनुभव ठरतो.

जुनं फर्निचर

दिग्दर्शक – महेश मांजरेकर, कलाकार – महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, गिरीश ओक, उपेंद्र लिमये, ओंकार भोजने.

Story img Loader