सलमान खानने नुकतीच आपल्या न्यायालयीन खटल्यांबाबतची http://www.salmankhanfiles.com वेबसाइट सुरु केली आहे. या वेबसाइटवर त्याच्या हिट अॅण्ड रन खटल्यासंदर्भातील सर्व माहिती पुरविली जात आहे. सदर वेबसाइटमुळे न्यायालयाचा अवमान होत असल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली आहे. हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सलमानवर अद्याप सदोष मनुष्यवधाचा खटला सुरु असताना त्याने न्यायालयीन कार्यवाहीसंबंधी माहिती पसरविण्यासाठी इंटरनेटचा वापर कसा केला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सलमानच्या या कृत्यामुळे न्यायालयीन कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे पाटील म्हणाले आहेत.
सलमानच्या न्यायालयीन प्रकरणांना समर्पित वेबसाईट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा