चित्रपटाला संगीत देणे आव्हानात्मक असल्याचे विख्यात संतूर वादक पं.शिवकुमार शर्मा यांचे म्हणणे आहे. पं.शिवकुमार यांनी काही हिंदी चित्रपटांना संस्मरणीय असे संगीत दिले आहे
बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावाने ओळखली जात असे.
या जोडीने अनेक चित्रपटांना संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने  ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) या चित्रपटांना संगीत दिले.
शिवकुमार शर्मा म्हणाले की, जेव्हा यश चोप्रांनी आमच्यासारख्या शास्त्रीय संगीतकारांना ‘सिलसिला’ चित्रपटास संगीत देण्यास सांगितले, तेव्हा ते मोठी जोखीम घेत असल्याचे अनेकांना वाटले. शास्त्रीय संगीत आणि चित्रपटाच्या संगीतात फार मोठा फरक असतो आणि त्यामुळे चित्रपटाला संगीत देणे हे आव्हानात्मक होते. चित्रपटाला संगीत देताना त्याची कथा, कलाकारांची परिस्थिती, ठिकाण आणि अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. तर दुसरीकडे शास्त्रीय संगीतामध्ये ‘राग’ मुख्य समजला जातो.