टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचा गोव्यात मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु सोनाली यांचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपाताचा संशय त्यांच्या बहिणीने व्यक्त केला होता. आता या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. सोनाली जिथे थांबल्या होत्या त्या ठिकाणाहून त्यांचा लॅपटॉप गायब असल्याची बाब समोर आली आहे.

हेही वाचा – “सोनालींच्या चेहऱ्यावर जखमा होत्या”; पुतण्याच्या आरोपानंतर पोलिसांनी शवविच्छेदनाबद्दल घेतला महत्वाचा निर्णय

सोनाली फोगटच्या फार्म हाऊसमधून त्यांचं कम्प्युटर आणि लॅपटॉप गायब झाल्याचे आढळून आले आहे. सोनालीचा पुतण्या अॅडव्होकेट विकास याने सोनालीच्या मृत्यूसाठी त्यांचा पीए सुधीर सांगवान याला जबाबदार धरलंय. सोनाली फोगटच्या हत्येचा कट सुधीर सांगवानने रचल्याचा आरोप विकासने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी सोनालीच्या पीएला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोनालीसमवेत सुधीर सांगवान गोव्यात होता, अशी माहिती मिळत आहे. सोनालीच्या कुटुंबीयांनी सुधीरवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा – VIDEO: सिद्धार्थ शुक्लाने ‘बिग बॉस’मध्ये केली होती सोनालींच्या एविक्शनची घोषणा; योगायोगाने दोघांचाही हार्ट अटॅकने झाला मृत्यू

“सुधीर सांगवान यांच्या सांगण्यावरून फार्म हाऊसमधून सोनालीचा लॅपटॉप आणि इतर वस्तू गायब करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्व डेटा आणि जमीन, मालमत्तेची कागदपत्रंही सेव्ह केलेली होती. आपलं सुधीर सागवानशी बोलणं झालं होतं आणि तो त्याच्या मामी सोनाली यांच्या मृत्यूबद्दल वारंवार त्यांची विधानं बदलत आहे,” असा आरोप विकासने केला. तसेच सुधीर सागवान यांच्याशी झालेल्या संवादाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही विकासने ऐकवले.

हेही वाचा – सोनाली फोगट यांच्या बहिणीने व्यक्त केला हत्येचा संशय; म्हणाल्या, “जेवणात काही तरी…”

दरम्यान, सोनाली फोगटच्या मृत्यूनंतर गोवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. प्राथमिक तपासाअंती सोनाली २२ ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या होत्या आणि त्या अंजुना येथील हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हॉटेलमध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.

Story img Loader