बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता आहे. रणबीर आणि आलिया यांनी याबाबत अद्याप मौन बाळगलं असलं तरीही या दोघांच्या लग्नाबाबत आता काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लवकरच हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार असून या दोघांच्या लग्नाचं ठिकाणी ठरलं आहे. मात्र या दोघांचा विवाहसोहळा हा खासगी स्वरुपाचा असणार आहे. ज्यात केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडमध्ये सध्या डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड आहे मात्र ‘पिंकव्हिला’नं दिलेल्या वृत्तानुसार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या चर्चित जोडीचं लग्न मात्र मुंबईमध्येच होणार आहे. मात्र लग्नासाठी त्यांनी कोणतंही फाइव्ह स्टार हॉटेल बुक केलेलं नाही. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी जेव्हा एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता त्याचवेळी त्यांनी लग्नाचं ठिकाणही ठरवलं होतं.

आणखी वाचा- ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबती लवकरच होणार बाबा? प्रेग्नन्सीच्या चर्चांवर पत्नीनं सोडलं मौन

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुंबईतील कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर कपूर कुटुंबीयांच्या प्रसिद्ध ‘आरके हाऊस’मध्ये सप्तपदी घेणार आहेत. लग्नाचं ठिकाण हे रणबीरनं स्वतः ठरवलं आहे. रणबीर कपूर आणि त्याची आजी कृष्णा राज कपूर यांचं खूप चांगलं बॉन्डिंग होतं. त्याचे आई- वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचं लग्नही लग्न २० जानेवारी १९८० रोजी याच आरके हाऊसमध्ये झालं होतं. त्यामुळे हे घर रणबीरसाठी खूप खास आहे आणि म्हणूनच त्यानं आरके हाऊसमध्ये आलियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा- आता कशी आहे अपघातात जखमी झालेल्या मलायकाची प्रकृती? बहीण अमृतानं दिली माहिती

आलिया आणि रणबीर यांच्या लग्नासाठी ४५० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं असून या लग्नाची सर्व जबाबदारी ‘स्क्वाड वेडिंग प्लॅनर्स’ यांच्याकडे असणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया याच म्हणजे एप्रिल महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र लग्नाची तारीख अद्याप समजलेली नाही. कपूर कुटुंबीयांनीही ही तारीख बाहेर कोणालाही समजणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confirm ranbir kapoor and alia bhatt about getting married at rk house in april know the details mrj