बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कंगनाने १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक मिळाली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे कंगनाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यावेळी कंगनाला काँग्रेसने नेते सलमान निझामी यांनी ट्रोल केले आहे.

सलमान निझामी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊँटवरून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ कंगनाचा आहे. या व्हिडीओत कंगना बोलते की “माझे पणजोबा ही स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे मी जेव्हा कोणती सरकारी परिक्षा द्यायची तेव्हा मला कोटा मिळायचा. कंगनाचा हा व्हिडीओ शेअर करत सलमान निझामी म्हणाले, “पणजोबा स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळे तू जसं बोलते त्या प्रमाणे, ते ही भिकारी होते ना? आणि कंगनाला भीकमध्ये सरकारी कोटा मिळाला? नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट करा!”

आणखी वाचा : KBC 13 : उंच आहात तर घरतील पंखे तुम्ही साफ करता का? एका लहानमुलाने विचारलेल्या प्रश्नाचे बिग बींनी दिले भन्नाट उत्तर

दरम्यान, एका मुलाखतीत “देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत,” असे कंगना म्हणाली होती. याच कारणामुळे कंगनाला ट्रोल केलं जातं आहे.

Story img Loader