तरुण पिढीवरील सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि या माध्यमाद्वारे काही क्षणांत जास्तीत जास्त चाहत्यांपर्यंत पोहचण्याच्या क्षमतेमुळे, अलीकडे अनेक बॉलिवूडमंडळी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. शिवाय या माध्यमाचा वापर करून त्यांना चाहत्यांच्या संपर्कात राहता येत असल्याने, चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी याचा चांगला उपयोग होतो. फेसबुक आणि टि्वटरनंतर आता चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवूडने व्हॉटस्अॅपच्या वापराला सुरुवात केली आहे. ‘बॉबी जासूस’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी चित्रपटकर्त्यांतर्फे व्हॉटस्अॅपवर खाते उघडण्यात आले आहे. चित्रपटात ‘बॉबी जासूस’ची मूख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या बालन व्हॉटस्अॅपवर चित्रपटाची प्रसिद्धी करणार आहे. जर तुमच्या आयुष्यात एखादी समस्या असेल, तर +91 8879948777 या क्रमांकावर व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून बॉबी जासूसशी संपर्क साधू शकता. तसे आवाहन ‘बॉबी जासूस’तर्फे करण्यात आले आहे. याआधी वरुण धवनने अशाप्रकारचा प्रयोग केला होता. असा प्रयोग करणारा वरुण हा बॉलिवूडमधील पहिला अभिनेता आहे. आपल्यासाठी वधू शोधून व्हॉटस्अॅपवर संपर्क साधण्याचे आवाहन त्याने चाहत्यांना केले होते.
बॉबी जासूसचा संपर्कासाठी आवाहन करतानाचा व्हिडिओ येथे पाहा:
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा