‘कौन बनेगा करोडपती १४’ (Kaun Banega Crorepati 14) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो आहे. अनेक स्पर्धक या शोमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी हॉट सीटवर येतात. होस्ट अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन ते पैसे जिंकतात. या शोचा नवा एपिसोड प्रदर्शित झाला आहे. या एपिसोडमध्ये ऋचा पवार या स्पर्धकाला रामायणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र, तिला या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने खेळ सोडावा लागला.

हेही वाचा – ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नाचं उत्तर येत नसल्याने तरुणानं सोडला केबीसी शो; तुम्हाला उत्तर माहितीये का?

या एपिसोडमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्टचे सर्वात आधी उत्तर देत सॉफ्टवेअर इंजिनीअर यशस्वी सक्सेना हॉट सीटवर आली. पण तिने 80 हजार रुपयांच्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले, त्यामुळे तिची जिंकलेली रक्कम कमी होत 10 हजारांवर आली. यशस्वीरनंतर गुजरातची ऋचा पवार हॉट सीटवर पोहोचली. रिचाने बिग बींच्या प्रश्नांना खूप समजूतदारपणे उत्तरं दिली आणि ती १२ लाख ५० हजारांच्या प्रश्नापर्यंत पोहोचली. पण साडेबारा लाखांच्या प्रश्नाचं ती उत्तर देऊ शकली नाही आणि तिला ६ लाख ४० हजारांची रक्कम घेत खेळ सोडावा लागला. तिला विचारण्यात आलेला साडेबारा लाखांचा प्रश्न हा रामायणाबद्दल होता. काय होता तो प्रश्न जाणून घेऊया…

हेही वाचा – KBC मध्ये एक कोटी रुपयांसाठी स्पर्धकाला विचारण्यात आला ‘हा’ प्रश्न; तुम्हाला उत्तर माहितीये का?

“खालीलपैकी कोणते वाल्मिकी रामायणातील कांडाचे नाव नाही?” असा तो प्रश्न होता. याच्या उत्तरासाठी सुंदर कांड, वनवास कांड, युद्ध कांड आणि किष्किन्धा कांड हे चार पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचं उत्तर वनवास कांड होतं. पण हे उत्तर ऋचाला माहित नव्हतं, त्यामुळे तिने ६ लाख ४० हजारांची रक्कम घेत खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – “सलमान खान मानसिक आजारी…”; अभिनेत्याच्या एक्सने इन्स्टा पोस्टमधून केले गंभीर आरोप

दरम्यान, या शोच्या ११ व्या सीझनमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला देखील रामायणासंबंधीत एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं. त्यानंतर सोनाक्षी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं. “रामायणात हनुमानाने संजीवनी बूटी कोणासाठी आणली होती?” असा प्रश्न सोनाक्षीला विचारण्यात आला होता. पण तिला उत्तर माहित नसल्याने तिने मदतीसाठी लाइफलाइन वापरली होती. रामायणाबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्याने ट्रोलर्सनी तुझ्या घराचं नाव रामायण असून आणि भावांची नावं लव-कुश असूनही तुला या प्रश्नाचं उत्तर येत नाही, असं म्हणत सोनाक्षीवा ट्रोल केलं होतं.  

Story img Loader