बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी आपल्याला २००० साली केबीसी सुरु होण्यापूर्वी टीबी झाला होता, असे एका कार्यक्रमात सांगितले. टीबी हारेगा, देश जितेगा या अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई महापालिकेकडून अमिताभ बच्चन यांना मोहिमेचे ब्रॅन्ड अम्बेसिडर करण्यात आले आहे. सदर अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.
अमिताभ म्हणआले की, रोज सकाळी उठल्यानंतर मला अशक्तपणा जाणवायचा. तापसणी केल्यानंतर माहित झाले, की मला टीबी आहे. टीबीचा सामना करण्यासाठी मला एक वर्ष लागले. पण, आता मी या आजारापासून पूर्ण बरा झालो आहे. तसेच, अमिताभ यांनी या अभियानामध्ये लोकांना लवकरात-लवकर टीबीवर उपचार करण्यास सुरुवात करा, असे आवाहनही केले.

Story img Loader