मल्याळम चित्रपटसृष्टीतील वादग्रस्त अभिनेता बाळा याने अनेक वर्षांनंतर कोची शहर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बाळाच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने त्याच्यावर छळ केल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल केला होता. मग त्याच प्रकरणात अटक करण्यात आली. जामिनावर बाहेर आल्यावर बाळाने एक आठवड्यानंतर तिसरे लग्न केले. आता याच नव्या पत्नीसह त्याने अनेक वर्षानंतर कोची शहर सोडले आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली.

रविवारी (१७ नोव्हेंबर) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करीत बाळाने सांगितले की, तो आणि त्याची पत्नी कोकिला यांनी कोचीला कायमचा राम राम ठोकला असून, त्यांनी एका नव्या ठिकाणी नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
UP Woman Elopes With Beggar
भिकाऱ्याच्या प्रेमात बुडाली, सहा मुलांना टाकून महिलेनं ठोकली धूम; पतीकडून गुन्हा दाखल
Image of a related graphic, a photo representing the incident, or a picture of a pride flag
Same Sex Marriage : वहिनीशी लग्न करण्यासाठी तरुणीचा हट्ट, कुटुंबीयांनी नकार देताच प्यायली विष
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Image of Criminal
२१ वर्षांच्या तरुणावर जडला महिलेचा जीव, लग्नास नकार दिल्याने केले धारदार शस्त्रांनी वार

हेही वाचा…भर कार्यक्रमात दीपिका पादुकोणच्या डिप्रेशन अन् मातृत्वावर केला विनोद; नेटकऱ्यांनी सुनावल्यावर कॉमेडियन म्हणाला, “माझ्या कमेंट…”

बाळाने कोकिलाबरोबरचा एक फोटो पोस्ट केला असून, त्याला कॅप्शन दिली आहे. तो म्हणतो, “धन्यवाद सगळ्यांना! मी आतापर्यंत केलेल्या चांगल्या गोष्टी करीत राहीन. पण, आता मी कोचीला राहत नाही. आम्ही कुटुंबाबरोबर कोचीत बराच काळ होतो; पण आज मी तुम्हाला आणि कोचीला सोडून जात आहे. फार लांब नाही; पण तरीही तुम्हाला न सांगता, कसं जाऊ शकतो? ज्यांनी मला प्रेम दिलं, त्यांच्याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. जसं प्रेम तुम्ही माझ्यावर केलं आहे, तसंच प्रेम तुम्ही माझ्या कोकिलावरही करा. मी सध्या कुटुंबासाठी आणि आरोग्यासाठी एका शांत व सुखकर ठिकाणी जात आहे. माझा कुणावरही राग नाही, सगळे सुखी राहावेत हीच इच्छा!”

नवीन लग्न, नवीन आयुष्य

कोकिला ही बाळाची चेन्नईतील एक नातेवाईक आहे. तिच्याशी त्याचा विवाह २३ ऑक्टोबर २०२४ रोजी एर्नाकुलमच्या कलूर पावाकुलम मंदिरात पारंपरिक हिंदू पद्धतीने झाला. या लग्नसोहळ्याला बाळाचे जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. या लग्नाच्या एका आठवड्यापूर्वीच बाळा जामिनावर सुटला होता. गायिका व अभिनेत्री आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सुरेश हिच्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली होती.

हेही वाचा…Bigg Boss 18 मध्ये सलमान खानने भर मंचावर सुनावलं; आता ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हर म्हणाला…

अटक आणि वाद

बाळाला त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून सोशल मीडियावरील बदनामी, महिलांचा अपमान आणि मुलांशी क्रूर वागणूक या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीनंतर बाळाला न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने त्याला त्याच्या आणि अमृताच्या मुलांचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर न करण्याचे निर्देश दिले असून, चौकशीसाठी सहकार्य करण्याची सूचना दिली आहे.

काही माध्यमांनी कोकिला ही बाळाची तिसरी पत्नी असल्याचा दावा केला आहे; तर काहींनी ती चौथी पत्नी असल्याचे म्हटले आहे. ‘ऑन मनोरमा’ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बाळाने सुरुवातीला चंदना सदाशिवाशी विवाह केला होता. त्यानंतर गायिका अमृता सुरेशशी आणि मग डॉ. एलिझाबेथशी लग्न केले होते. २०१९ मध्ये अमृताबरोबर त्याचा घटस्फोट झाला आणि नंतर त्याचं एलिझाबेथबरोबरचं नातंही तुटलं..

हेही वाचा…ट्विंकल खन्ना निर्मात्यांसमोरच चित्रपटाला ‘बकवास’ म्हणाली अन्…; अक्षय कुमारने सांगितला पत्नीचा किस्सा

चित्रपटातील प्रवास

बाळा हा कंगुवा या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाचा भाऊ आहे. बाळा नुकताच वादग्रस्त चित्रपट दिग्दर्शक ओमर यांच्या बॅड बॉईज (२०२४) चित्रपटात दिसला होता.

Story img Loader