गेल्या काही वर्षांपासून टेलिव्हिजन विश्वाला टक्कर देत युट्यूबचं जाळं फारच पसरले आहे. नवनवीन संकल्पना, त्या सादर करण्याची पद्धत, तरुणाईला त्यांच्याच पद्धतीने काही विषय समजावून सांगण्यासाठी केला जाणारा आटापिटा या साऱ्यातून जन्माला आले ‘युट्यूबर’. कोणी महागड्या गाड्यांविषयी माहिती देणारे युट्यूब चॅनल सुरु केले, तर कोणी भटकंतीविषयी माहिती देणारे चॅनल सुरु केले. विविध संकल्पनांना प्रभावीपणे सादर करण्याच्या या उत्साही वातावरणात एक अशी युट्यूबर नावारुपास आली जिने अनेकांच्याच कानठळ्या बसवल्या. ती युट्यूबर म्हणजे ‘ढिंच्याक पूजा’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सेल्फी मैने लेली आज’, ‘दिलों का शूटर है मेरा स्कूटर’, ‘बापू दे दे थोडा कॅश’, अशी विचित्र गाणी सादर करणाऱ्या पूजाचा व्हिडिओ कुठे वाजू लागला की, लगेचच तिच्याविषयीच्या चर्चा रंगू लागतात. मुख्य म्हणजे तिची गाणी कशीही असली तरीही वेब जगतात तिची लोकप्रियता पाहता ‘बिग बॉस’ या वादग्रस्त कार्यक्रमानेही तिची दखल घेतली आहे. तिच्या नावापासून ते अगदी ‘ढिंच्याक’ गाण्यांपर्यंत जाणून घेण्यासाठी अनेकांनीच सोशल मीडियाची मदत घेतली. विविध वेबसाइट्सवर उपलब्ध माहितीनुसार या ‘ढिंच्याक’ युट्यूबरचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. सध्या ती दिल्लीमध्ये राहतेय.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

तिचं खरं नाव आहे, पूजा जैन. ‘ढिंच्याक’ या शब्दाची निवड खुद्द पूजानेच केली असून, यातून तिने एक वेगळी ओळख मिळवली आहे. कोणा एका मित्र/ मैत्रीणीने ती चांगली गाते असा विश्वास दिला आणि तेव्हापासून पॉप संगीतप्रकारात ‘ढिंच्याक’ क्रांती घडवण्याच्या दिशेने पूजाचा प्रवास सुरु झाला. तिच्या गाण्यांमध्ये काहीही तथ्य नसले तरीही सोशल मीडियावर तिच्या नावाची हवा पाहता प्रत्येक गाण्याच्या व्हिडिओवर असंख्य व्ह्यूज मिळण्यासाठीही तिला फार मदत होते. ‘सेल्फी मैने ले ली आज’ या एका गाण्याने तिला सात लाख रुपये मिळवून दिले होते.

सोशल मीडियावरही पूजा बरीच सक्रिय असून, ट्विटवरुन ती वेगळ्याच दृष्टीकोनातून आपले विचार मांडत असते. हे आहेत तिचे काही ट्विट्स आणि इन्स्टाग्राम पोस्ट…